दिपावली सणाचा पहिला दिवस “वसुबारस”                          आमच्या सर्व वाचकांना 

                   "नगर टुडे" परिवाराच्या

                      वतीने हार्दिक शुभेच्छा ! 


  दिपावली सणाचा पहिला दिवस “वसुबारस” 

वुसबारस… गाय गोऱ्ह्यांची  बारस म्हणुन देखील ओळखला जातो अश्विन कृष्ण व्दादशीला येणारा हा दिवस गोवत्स व्दादशी म्हणुन ओळखतात.वसुबारसचा अर्थ वसू म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी संध्याकाळी गाय-वासराची पूजा करतात ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद-कुंकू फुले अक्षता वाहून चौर्या च्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात या दिवसापासून रांगोळी काढण्यास सुरुवात होते. 

वसुबारस हा दिवस साजरा करण्यामागे एक पुराणकथा सांगीतली जाते.

ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी त्यातुन पाच कामधेनुंची उत्पत्ती झाली होती. या कामधेनुंमधे नंदा नावाची एक कामधेनु होती तीला उद्देशुन वसुबारस हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.असं म्हणतात की मानवाच्या जन्मोजन्मीच्या ईच्छा पुर्ण व्हाव्यात आणि गायीच्या अंगावर जेवढे केस आहेत तितकी वर्ष स्वर्गात वास्तव्य करता यावे म्हणुन गोवत्स व्दादशीचा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. 

आपला देश शेतीप्रधान व कृषीप्रधान असल्याने या दिवसाचं एक आगळंवेगळं महत्व समजल्या जातं. हिंदु संस्कृतीत गायीला गोमाता समजले जाते तिच्या उदरात तेहतीस कोटी देवांचा वास आहे आणि म्हणुन गायीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता वसुबारस हा दिवस साजरा केल्या जातो.

पूजेचे विधी 

दिवाळीच्या दिवसांमधे पहाटे उठुन दारात रांगोळी रेखाटावी दिवे लावावेत. तिन्ही सांजेला गायीचे पाय धुवुन गाय वासराची पुजा करावी. तीला हळद कुंकु, फुलं, अक्षता वाहाव्यात फुलांचा हार घालावा निरांजन ओवाळावी. गायीच्या वासराची देखील अश्याच पध्दतीनं पुजा करावी गोडाधोडाचा घास भरवावा.

गायीभवती प्रदक्षिणा घालावी. अनेक ठिकाणी गाय वासरू उपलब्ध होत नाहीत त्यावेळी आपल्या घरी देवपाटाजवळ गायवासराचे चित्र रेखाटावे आणि पुजा करावी.गायीचे दुध ( दुधापासुन दही, ताक, लोणी, तुप ) अमृतासमान मानले जात असुन अनेक रोगांवर रामबाण उपाय देखील आहे. अश्या गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता या दिवसाचे महत्व सांगीतले आहे. आपल्या मुलांना चांगल्या आरोग्याचा लाभ व्हावा आणि ते सुखी व्हावे म्हणुन सुवासिनी या दिवशी पुजा करतात.

या दिवशी दुधापासुन बनविलेले पदार्थ खात नाहीत.सवाष्ण स्त्रिया वसुबारस या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खातात.अनेक ठिकाणी गायीला लक्ष्मीचे रूप देखील मानले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष गाय न भेटल्यास या दिवशी अनेक जण मातीची, पितळीची अन्यथा चांदीची गाय बनवुन तीची पुजा करतात.अनेक जण गोशाळांमधे अथवा गोरक्षण संस्थांमधे जाउन गायीची पुजा करतात आणि तिला नैवेद्य भरवितात.


Post a Comment

0 Comments