बिहारच्या विजयाचा नगर शहर भाजपाच्यावतीने आनंदोत्सव

 बिहारच्या विजयाचा नगर शहर

भाजपाच्यावतीने आनंदोत्सव

भैय्या गंधे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांचा विजय 

     वेब टीम नगर - बिहार विधानसभेत भाजपा आघाडीला बहुमत मिळवून सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टी नगर शाखेच्यावतीने पक्ष कार्यालयासमोर  पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, उपमहापौर मालनताई ढोणे, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, सरचिटणीस महेश नामदे, जगन्नाथ निंबाळकर, महिला आघाडीच्या सुरेखा विद्ये, कालिंदी केसकर, शिवाजी दहिहंडे , अनिल सबलोक,अमोल निस्ताने, वसंत राठोड, पंकज जहागिरदार, अजय चितळे, योगेश मुथा, आशिष अनेचा, संतोष गांधी, रमेश धडकिया, अविनाश साखला आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

     याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात केलेली विकास कामे व सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे भारतीय जनता पार्टीवर लोकांचा विश्‍वास वाढत आहे. त्यामुळेच बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढून सहकारी पक्षासह बहुमत मिळाले आहे. बिहारी जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने हा विजय मोठा आहे. यापुढील काळातही भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला विकासाच्या मार्गावर नेईल. या विजयाने कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याचे सांगितले.

     उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या, भाजपने भाजपने देशात विविध विकास कामे केली आहेत ती जनतेला पटू लागली आहे, त्या विकास कामांच्या जोरावरच जनता मतांच्या रुपाने पक्षाला यश मिळवून देत आहे. बिहार बरोबरच मध्यप्रदेश, गुजराथ येथील पोटनिवडणुकीतही भाजपाने चांगले यश संपादन केले आहे, त्या यशाचे श्रेय  तेथील भाजपाच्या कार्यकर्त्यांना जाते. या यशाचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

     अ‍ॅड.विवेक नाईक यांनी प्रस्ताविकात बिहार विजयाचे विश्‍लेषण केले. जगन्नाथ निंबाळकर यांनी आभार मानले. या जल्लोषास भाजप पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष,  महिला आघाडींचे पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी पदाधिकार्‍यांनी भाजी विक्रेते, व्यवसायिक व नागरिकांना पेढे वाटून फटाके फोडले.

Post a Comment

0 Comments