दिवाळी शॉपिंग महोत्सव

दिवाळी शॉपिंग महोत्सव 

उपनगरताही ग्राहकांसाठी तयार फराळ


दिवाळी म्हटलं की खमंग खुसखुशीत पदार्थांची रेलचेल असते मात्र भाजणे, तळणे या गोष्टींना फाटा देऊन तयार पदार्थ  विकत घेण्याकडे नागरिकांचा कल असतो. एरवी घरगुती फराळ बनवून देण्याच्या उद्योगाला या वर्षापासून व्यावसायिक स्वरूप आणि तेही ग्राहकांच्या आग्रहापोटी देण्यात नंदराज केटरर्स ला यश आले आहे.

नंदराज केटरर्सने खास उपनगर वासीयांसाठी कोहिनूर मंगल कार्यालय येथे तयार फराळाचे दालन सुरू केले आहे. त्यांत तब्बल 20 पदार्थ उपलब्ध असून त्यात मोतीचूर लाडू, रवा लाडू, बेसन लाडू, शंकरपाळे, मसाला शेव , लसूण शेव, पालक शेव, कच्च्या पोह्यांचा चिवडा, गुलाबजामुन, बालुशाही, क्रांती पोहे चिवडा, चकल्या, करंज्या, असे घरगुती पदार्थांच्या त्यात समावेश आहे. 

यातील काही पदार्थ मागणीनुसार शुद्ध तुपात बनवून दिले जातात मात्र त्यासाठी दोन दिवस आधी मागणी नोंदवावी लागते.मोतीचूर लाडू, रवा लाडू, बेसन लाडू, शंकरपाळे, मसाला शेव, लसूण शेव, पालक शेव, आदी पदार्थ २५० रुपये प्रति किलो तर क्रांती पोहे चिवडा, भडंग चिवडा, चकल्या, ३५० रुपये प्रतिकिलो दरात उपलब्ध असून गावरान तुपातील बेसन लाडू आणि करंज्या ४०० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत २५ वर्षांपासून केटरिंग व्यवसायात असलेल्या नंदराज केटरर्स यांना लोकांना आवडणाऱ्या चवीची जाण असल्याने ते या व्यवसायात यशस्वी होतील यात शंका नाही. 

 फोन वरती ऑर्डर स्वीकारल्या जातात. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिवाळी निम्मित प्रसिद्ध होणाऱ्या कथा , कविता , आणि वार्षिक राशी भविष्याच्या सदरासाठी जागा उपलब्ध व्हावी या साठी भ्रमंती हे सदर दिवाळी होई पर्यंत स्थगित करण्यात  आहे . Post a Comment

0 Comments