भर चौकात फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉनच्या पुतळ्यास फाशी

भर चौकात फ्रान्सचे राष्ट्रपती

मॅक्रॉन यांच्या पुतळ्यास फाशी

मॅक्रॉनचे फोटो असलेले फलक पायदळी तुडवून त्यावर चिखलाचा मारा

मोहंमद पैगंबरांचं व्यंग्यचित्र काढणार्‍या मासिकाचे समर्थन केल्याचा निषेध आंदोलकांना अटक

वेब टीम नगर - अहमदनगर जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील हातमपुरा चौकात फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या पुतळ्यास फासावर टांगण्यात आले. तर मॅक्रॉनचे फोटो असलेले फलक रस्त्यावर लावून पायदळी तुडवून त्याच्यावर चिखलाचा मारा करण्यात आला. मोहंमद पैगंबरांचं व्यंग्यचित्र काढणार्‍या मासिकाचे समर्थन केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मुजाहीद सय्यद, साहेबान जहागीरदार, तन्वीर शेख, नईम सरदार, अन्जर खान, नूर सय्यद, फिरोज शेख, शाह फैसल, सरफराज जहागीरदार, जुबेर शेख, बिलाल शेख, वसिम शेख, खालिद शेख, अल्तमश जरीवाला, शाकिर शेख, मुबीन शेख, शरीफ बेग, इम्रान पठाण, फैरोज शेख, वाहिद शेख, अज्जू शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोहंमद पैगंबरांचं अपमान करणार्‍याला फाशी हीच शिक्षा योग्य असल्याचे सांगून आंदोलकांनी चौकात मॅक्रॉनचा प्रतिकात्मक पुतळ्यास चपलांचा हार घालून खांबाला लटकविले होते. तर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी तात्काळ माफी मागवी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी मोहंमद पैगंबरांचं अपमान करणार्‍यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेऊन आंदोलकांना ताब्यात घेतले. कोतवाली पोलीस ठाण्यात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments