अर्जुन रामपालही एन.सी.बीच्या जाळ्यात

अर्जुन रामपालही  एन.सी.बीच्या जाळ्यात 

अंधेरी आणि वांद्रे येथील घरांची झडती वेब टीम मुंबई – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातुन समोर आलेल्या  बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनच्या तपासाला आता गती मिळाली आहे. अंमली विरोधी पथकाने आता बॉलिवूडचा अभिनेता अर्जुन रामपाल याच्याघरी छापा टाकला आहे. याआधी एनसीबीच्या टीमने अर्जुनच्या ड्रायव्हरला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.त्यातून मिळालेल्या माहिती नुसार पथकाने कारवाई केली. अंमली विरोधी पथकाने आज सकाळी अर्जुन रामपाल यांच्या अंधेरी आणि वांद्रे येथील घरावर छापा टाकत कारवाई केली आहे. अर्जुनच्या घराची झाडाझडती सुरू झाली आहे. याआधी एनसीबीने ड्रग्स बाळगणे आणि खरेदी करण्याप्रकरणी अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रैब्रिएला डिमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियालोस याला ताब्यात घेतले होते. त्याला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. पण पुन्हा एकदा एनसीबीने अगिसियालोसला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे.रविवारीच ड्रग कनेक्शनमध्ये निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीलाही एनसीबीने अटक केली. मुंबईतील लोखंडवाला, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरातही रविवारी छापेमारी करण्यात आली होती. याआधी एनसीबीच्या टीमने अनेक फिल्मी स्टार्स, दिग्दर्शकच्या घरी छापे मारले. शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. कारवाईमध्ये १० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. एकूणच रिया चक्रवर्ती नंतर आता सिनेसृष्टीतील मोठे मासे एन.सी.बीच्या जाळ्यात अडकणार असल्याचे सूतोवाच नगर टुडेने या अगोदरच केले होते. नाडियाडवाला नंतर आता अर्जुन रामपाल एन.सी.बीच्या जाळ्यात अडकला असून यापुढे कोण याबाबत उत्सुकता आहे.  

Post a Comment

0 Comments