डिझेल प्रकरणाची पाळमूळ तपासण्यासाठी संदीप मिटकेंची नियुक्ती

डिझेल प्रकरणाची पाळमूळ 

तपासण्यासाठी संदीप मिटकेंची नियुक्ती 


मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी   

वेब टीम नगर - शहरात २६ सप्टेंबर रोजी पकडलेल्या बनावट डिझेल प्रकरणाचा तपास आता पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे.मिटके यांना नगर जिल्ह्यातील कामकाजाचा मोठा अनुभव असल्यामुळे ते या प्रकरणातील पाळंमुळं शोधून काढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आज नगर जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनीही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देऊन राजकीय दबावाला बळी न पडता निपक्षपणे चौकशी करून या प्रकरणाच्या प्रमुख सूत्रधारांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे.

कर्डिले यांनी पोलिस अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर जिल्ह्यातील बनावट डिझेल बाबत पोलीस पथकाने कारवाई करून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे,मात्र अद्यापपर्यंत या डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही. यापूर्वीच्या नाप्ता भेसळ प्रकरणाचा तपासही अजून पर्यंत पूर्ण झालेल्या नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची माहिती आहे.यातील मुख्य सूत्रधाराला त्वरित अटक करण्यात यावे.

   


  नगर जिल्ह्यात बनावट डिझेल व नाप्ता भेसळीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटला मोठा राजकीय वरदहस्त असल्याने खुलेआम बनावट डिझेल विक्री केली जात आहे. नाप्ता भेसळीचे रॅकेट ही यापूर्वी जिल्ह्यात सापडलेले आहे मात्र या प्रकरणाचा तपास अजून पर्यंत पूर्णत्वास गेलेल्या नाही. आता पुन्हा डिझेल भेसळीचे रॅकेट उजेडात आले आहे. डिझेल भेसळीबाबत पोलीस पथकाने कारवाई करून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे मात्र अद्यापर्यंत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व इतर आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.राजकीय दबावापोटी कारवाईस विलंब होत असल्याचे दिसत आहे तरी या प्रकरणात राजकीय दबावाला बळी न पडता बनावट डिझेल व नाप्ता  भेसळीचा योग्य व निपक्ष तपास करून मुख्य सूत्रधारासह इतर सहा आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.

बनावट डिझेल प्रकरणाचा तपास तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडून काढून घेत श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला गती न मिळाल्यानेच हा तपास ढुमे यांच्याकडून मिटके यांच्याकडे दिल्याची चर्चा आहे. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने २६ ऑक्टोबर रोजी शहरातील जीपीओ चौक परिसरात छापा टाकून १ हजार ९३७ लिटर बनावट डिझेल जप्त केले होते.या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला होता. हे प्रकरण गंभीर असतानाही गेल्या पंधरा दिवसांत या गुन्ह्यात केवळ दोघांचा अटक झालेली आहे.पहिल्या आरोपीला तर घटनेच्या दिवशीच अटक झाली होती. त्यानंतर या प्रकारणात ढुमे यांच्या पथकाने जामखेड येथील एकास अटक केली़. त्यानंतर तपासात विशेष काही प्रगती दिसून आली नाही.उपाधीक्षक संदिप मिटके यांना जिल्ह्यात कामाचा अनुभव जास्त असल्याने हा तपास त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला असल्याच सुत्रांकडुन समजते.


Post a Comment

0 Comments