भ्रमंती

भ्रमंती 

रमणीय चांदबिबीचा महाल... नव्हे सलाबतखानाची कबर

नगर शहरात येताना कोणत्याही दिशेने पूर्वेकडे पाहिल्यास एक टुमदार इमारत दिसते ही इमारत म्हणजे चांदबिबीचा महाल अर्थात हे त्या इमारतीचे चुकून पडलेलं नाव आहे.ही मूळ इमारत सलाबत खानाच्या महत्त्वाकांक्षेतून उभी राहिली अन सरतेशेवटी त्याची कबर तेथे असल्याने सलाबतखानाची कबर म्हणून ओळखली जाते. 

नगर शहरापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर शहा डोंगर आहे या डोंगराची पायथ्यापासून ची उंची 900 मीटर असून समुद्रसपाटीपासून उंची 3080 फूट इतकी आहे शहा डोंगर आणि मांजरसुंबा जवळील डोंगर यांना शहराच्या संरक्षणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. 


पहिल्या मुर्तूजा निजामशहाचा प्रधान सलाबतखान यांनी हा महाल बांधला असून डोंगर माथ्यावर बांधलेल्या ही अष्टकोणी इमारत त्यासाठी वापरलेल्या दगडी चिरा येथे कशा आणल्या इथपासून ते सुबक बांधणी पर्यंत अनेक कुतूहलाचा प्रश्न तिथे गेल्यावर पडतात. 

उंच डोंगरावर असलेली ही तीन मजली इमारत शत्रूवर नजर ठेवण्यासाठी टेहळणी करता बांधली असावी त्याचबरोबर अनेक मजली इमारती उभारून त्या इमारतीतून दौलताबादचा किल्ला दृष्टीस पडावा अशी सलाबतखानाची इच्छा होती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बांधकामही पूर्ण झालेले नाही मात्र इथल्या भव्य कमानी आजही पर्यटकांना भुरळ घालतात तिथे घोंगावणारा थंडगार वारा निरव शांतता त्यामुळेच पूर्वीच्या काळी जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी उन्हाळ्यात या थंड हवेच्या वास्तुत वास्तव्य करीत असत. 

आजही बऱ्यापैकी मजबूत स्थितीत असलेल्या या इमारतीस पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात या इमारतीच्या सुशोभीकरणासाठी ही पुरातत्त्व खात्याने लक्ष घातले असून महालाच्या प्रवेशद्वारापासून मुख्य इमारतीपर्यंत जाण्यासाठी दगडी रस्ता इमारतीच्या सभोवार बसविलेले पिण्याच्या पाण्याची सोय अधिक गोष्टी उपलब्ध करून दिल्या असल्याने सुट्टीच्या दिवशी छोटेखानी सहज म्हणून नगरकर पर्यटकांची येथे गर्दी होते.

 

चांदबिबीचा महाल उर्फ सलाबतखानाची कबर असलेल्या रमणीय स्थळ आला एकदा नव्हे वारंवार भेट देण्याची इच्छा तिथे गेल्यावर होते हेच खरं तिथे सकाळी व्यायामासाठी येणार्‍या लोकांची ही संख्या मोठी आहे. 




Post a Comment

0 Comments