आरोग्य आहार

आरोग्य आहार 

नाचणी उपमा 


साहित्य : नाचणी रवा १ वाटी , बारीक चिरलेला कांदा , गाजर , हिरवी मिरची , मटार , कधी पत्ता, उडीद डाळ , कोथिंबीर, मीठ , साखर, लिंबू , शेंगदाणे, ओला नारळ. 

कृती: प्रथम अख्खी नाचणी रवाळ दळून आणावी.ती चाळुन घेऊन पीठ वेगळे काढावे. त्याच प्रमाणे जाडसर नाचणी सुद्धा काढून टाकावी.फक्त रवा एक वाटी घ्यावा.एक वाटी रवा बुडेल एवढे पाणी घेऊन भिजवून ठेवावा. २ तास भिजवावा तो फुगुन मोकळा होईल . एका कढईमध्ये तेल घेऊन , तेल तापल्यावर त्यात छोटा चमचा उडीद डाळ , हिरवी मिरचीचे तुकडे टाकणे , कढीपत्ता , हिंग , बारीक चिरलेला कांडा , गाजर तुकडे , वाफवलेला मटार टाकून परतणे, त्यामध्ये दिड वाटी पाणी टाकणे . मीठ , साखर , लिंबू टाकून , एक उकळी आणणे , उकळी आल्यानंतर भिजवलेला रवा टाकणे . चांगल्या २ वाफ काढणे . 

कोथिंबीर व ओला नारळ चव टाकून सर्व्ह करणे. 

टीप: रवा भाजून घेऊन भिजावयास ठेवणे , याच प्रमाणे ज्वारीचा उपमा देखील खूप छान होतो  




Post a Comment

0 Comments