जागतिक क्ष-किरण दिवस सिव्हील हॉस्पिटलमध्ये साजरा

जागतिक क्ष-किरण दिवस

 सिव्हील हॉस्पिटलमध्ये साजरा

   वेब टीम नगर - जागतिक क्ष-किरण (रेडिओलॉजी) दिवस सिव्हील हॉस्पिटलमध्ये साजरा करण्यात आला. क्ष-किरण शोधाचे जनक जर्मनीचे डॉ. विल्यम कॉनरॅड रोईंटजेन यांच्या प्रतिमेस सिव्हील सर्जन डॉ.सुनिल पोखरणा यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुशिल सोनवणे, विभागप्रमुख रामेश्‍वर काटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज घुगे, डॉ.सुशिल नेमाने, युवान संस्थेचे अध्यक्ष संदिप कुसाळकर, सेक्रेटरी सुरेश मैड, दरेकर , डॉ.महावीर कटारिया, डॉ.करुणा दर्डा, डॉ.कृष्णाजी बाचकर, डॉ.चेतन गणगणे, डॉ.अरविंद आघाव, डॉ.सुनिल काळे व स्टाफ उपस्थित होता.

     स्वागत मयुर कुलकर्णी यांनी केले. प्रास्तविकात डॉ.चेतन गणगणे म्हणाले, ८ नोव्हेंबर १८९५ साली क्ष-किरणाचा जर्मनी येथे डॉ.विल्यम कॉनरॅड रोईंटजेन यांनी १२५ वर्षांपूर्वी प्रथम शोध लावला. महत्वाचे म्हणजे जीवाची पर्वा न करता त्यांनी त्यांची सुपत्नी अ‍ॅना बर्था रोईंटजेन हिच्यावर प्रथम क्ष-किरणाची त्यांनी चाचणी केली व ती यशस्वी झाली. या शोधामुळे वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णांच्या सुक्ष्मातील सुक्ष्म अशा इजांचा शोध लागून त्यावर उपचार करणे डॉक्टरांना सोपे झाले. अशा या महान विल्यम कॉनरॅड रोईंटजेन यांना आदरांजली अर्पण करणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे.

      या कार्यक्रमामध्ये या दिवसाचे औचित्य साधून युवान या सामाजिक संस्थेच्या वतीने अत्याधुनिक असे अमेरिकन मेक ४०० एम.एम. जी.ई. हे मशिन युवान या संस्थेतर्फे देणगी दाखल देण्यात आले. युवानचे अध्यक्ष संदिप कुसाळकर, सेक्रेटरी सुरेश मैड, दरेकर सर यांनी सिव्हील हॉस्पिटलचे कोविड-१९ काळातील अतिशय उच्च दर्जाचे कार्य पाहून हे अद्यावत मशिन देणगी दाखल दिले आहे. सुरेश मैड यांच्या हस्ते या मशिनची पूजा करुन, फित कापून लोकार्पण करण्यात आले.


     सिव्हील हॉस्पिटलमधील छोटेखानी कार्यक्रमामध्ये  सिव्हील सर्जन डॉ.सुनिल पोखरणा यांनी युवान संस्थेचे आभार मानून ते म्हणाले,  अतिशय उच्च दर्जाचे हे मशिन असून, रुग्णांच्या अतिशय सुक्ष्म अशा इजांचे निरिक्षण करुन डॉक्टरांचा उपचार करणे यामुळे सोपे होईल. सर्वसामान्य रुग्णांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये अधिक चांगली सेवा देणे शक्य होणार आहे. याबरोबरच हॉस्पिटलमध्ये सोनाग्राफी- फोर-डी, एमआरआय ही अद्यायावत मशिन्स देखील सिव्हीलमध्ये उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न सुरु असून, लवकरच आम्हाला यात यश येईल, अशी आशा व्यक्त केली. पूर्वी सिव्हीलमध्ये उपचार करणे म्हणजे लोकांना कमीपणाचे वाटत होते. परंतु सध्या या हॉस्पिटलमध्ये असलेल्या अत्याधुनिक मशिनरीमुळे व चांगल्या डॉक्टर्स् व स्टाफच्या गुणवत्तेमुळे, चांगल्या सेवामुळे या हॉस्पिटलची रुग्ण सेवेची विश्‍वार्हता वाढीस लागली असल्याचे त्यांनी सांगितले.

     सुरेश मैड बोलतांना म्हणाले, कोरोना विषाणुच्या काळात सिव्हील हॉस्पिटलमधील सर्वांनीच जीवाची पर्वा न करता दिलेल्या रुग्णसेवेला मी वंदन करतो. अनेक रुग्णांचे प्राण या हॉस्पिटलने वाचवून एक चांगले रुग्णसेवेचे कार्य लोकांसमोर ठेवले आहे. खर्‍या अर्थाने आपण कोरोना योद्धा आहात. आपल्या या चांगल्या कार्याची पावती म्हणूनच युवान संस्थेच्यावतीने यापुढेही जी काही आवश्यक मदत करणे आम्हाला शक्य होईल ती आम्ही निश्‍चितच देऊ. असे सांगून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

     युवानचे अध्यक्ष संदिप कुसाळकर यांनी सर्व डॉक्टर्स व स्टाफ यांना धन्यवाद दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैज्ञानिक अधिकारी रवी पगारे, नलिनी गायकवाड, प्रशांत झरेकर, प्रकाश करोसिया, तानाजी पवार, मोहसिन शेख, सचिन नरवडे, अमोल कापडे, कक्षसेविका मोहिनी बोरुडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर कुलकर्णी यांनी केले तर रवी पगार यांनी आभार मानले


Post a Comment

0 Comments