सारडा महाविद्यालयाच्या समन्वयक ब्रिजलाल सारडा यांची नियुक्ती

सारडा महाविद्यालयाच्या समन्वयक ब्रिजलाल सारडा यांची नियुक्ती


 वेब टीम नगर – पेमराज सारडा महाविद्यायाला नॅकचे ए मानांकन पुन्हा मिळण्यासाठी हिंद सेवा मंडळाच्या वतीने माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांची संस्थेच्या समंवयकपदी नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीत मंडळाचे मानद सचिव संजय जोशी व सारडा महाविद्यालयाचे चेअरमन  ॲड.अनंत फडणीस यांनी नियुक्तीचे पत्र सारडा यांना दिले. यावेळी अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, डॉ.पारस कोठारी, अशोक उपाध्ये, मधुसूदन सारडा, अनिल देशमुख, मकरंद खेर, जगदीश झालानी, आदिक जोशी, सचिन मुळे, नूतन प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, अनंत देसाई, बी.यू.कुलकर्णी,  प्रबंधक अशोक असेरी, उपप्राचार्य डॉ.मंगला भोसले, डॉ.सुजय कुमावत आदी उपस्थित होते.

            यावेळी संजय जोशी म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयाने चौफेर प्रगती करत यापूर्वी दोनदा नॅकचे ए मानांकन मिळवले आहे. त्यावेळी महाविद्यालयाचे चेअरमन असलेले ब्रिजलाल सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे नॅक मानांकन प्राप्त झाले होते. आता येत्या २०२१ मध्ये सारडा महाविद्यालात पुन्हा नॅक कमिटी येणार आहे. त्यामुळे यावेळीही ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

            प्रा.शिरीष मोडक म्हणाले, एखाद्या महाविद्यालयास नॅक मानांकन मिळणे ही मोठी अभिमानाची बाब असते. सारडा महाविद्यालयाने हा बहुमान दोन वेळीस मिळवला आहे. आता पुन्हा येत्या वर्षात हे मानांकन मिळवणार आहोत. यासाठी ब्रिजलाल सारडा यांच्या सारख्या अनुभवी समंवयकांची नियुक्ती मंडळाने केली आहे.

            ब्रिजलाल सारडा म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या जडण घडणीत सारडा कुटुंबियांचे सुरवाती पासून योगदान आहे. त्यामुळे हिंद सेवा मंडळाने दिलेली जवाबदारी कार्त्याव्याच्या भावनेतून स्वीकारून सर्वांना बरोबर घेऊन पार पडू. पुन्हा महाविद्यालयाच्या शिरपेचात नॅक मानांकनचा तुरा रोवू. 


Post a Comment

0 Comments