भ्रमंती

 भ्रमंती 

इंडो - इस्लामिक स्थापत्यशैलीतला अप्रतिम नमुना "फऱ्या बाग"


निजामशाहीतील बादशहांनी नगर मध्ये आपल्या कुटुंबियांना राहण्यासाठी ज्या वास्तू निर्माण केल्या त्यापैकी एक फराहबक्श किंवा फऱ्या बाग महाल हा एक इंडो - इस्लामिक स्थापत्य शैलीतील अप्रतिम नमुना आहे.नगर शहराच्या आग्नेय दिशेस नगर-सोलापूर रस्त्यावर अवघ्या दोन - अडीच किलोमीटर वर हा महाल बांधलेल्या असल्याने हा त्या काळातील बांधलेल्या अन्य राज प्रासादांच्या वास्तुशिल्पांमधील ताईत ठरेल अश्या या महालाचे बांधकाम बुर्हाण निझाम याने १५०८ मध्ये चंगीझ खानाच्या करवी  सुरवात केली आणि न्यामतखानाच्या देखरेखी खाली १५५३ मध्ये हा महाल बांधून पूर्ण झाला. 

सभोवार विस्तीर्ण चौकोनी हौदाच्या मध्यभागी हि अष्टकोनी वास्तू दिमाखात उभी राहिली.भोवताली मोठे मोठे कारंजे आणि ह्या इमारतीच्या भव्य कमानी , त्यावर मोठा  घुमट आणि महालाच्या वरच्या मजल्यावर असलेला रंगमहाल अशी भुरळ पडणारी हि वास्तू . बुर्हाण निझामशहा हा दिल्लीतील प्रख्यात गायक फतेहशाह याच्या बरोबर बुद्धिबळाचा डाव रंगवत असे फतेहशाह साठी निझामाने उद्यानातच एक छोटेखानी महाल बांधला होता.त्याला लक्कड महाल असे.सुलताना चांदबीबी या ठिकाणी अधून मधून वास्तव्य करत असे. या महालाची अंतर्गत सजावट चांदबिबीने स्वतःच्या संकल्पनेतून केली होती. उंची पडदे , महागडे गालीन यांनी हा महाल उत्तम रित्या शृंगारलेला होता. सन १६७९ साली सदाशिवराव पेशवे निझाम अली खानावर स्वारी करण्यास नगर मार्गे जात असता त्यांनी देखील याच महालात आपला मुक्काम टाकला होता. 

मात्र आज या इमारतीची मोठी विदीर्ण अवस्था झाली आहे. पुरातत्व खात्या कडून  येणाऱ्या तुटपुंज्या तरतुदीतून महालाची डागडुजी सुरु असते . मात्र  या महालातील सागवानी लाकडं चोरट्यांनी पळवल्याने या इमारतीची दुर्दशा झाली असून इमारतीच्या जतन कार्यातही मोठे अडथळे निर्माण होत आहेत. नव्हे हि देखणी वास्तू कालौघात कधी कालकुपीत लुप्त होईल हे सांगता येत नाही. Post a Comment

0 Comments