‘खरेदिवाला’नावाचे मराठमोळे स्टार्टअप

 ‘खरेदिवाला’नावाचे मराठमोळे स्टार्टअप 

फ्रांचाईसीसाठी संपर्क करण्याचे प्रवर्तकांचे आवाहन


वेब टीम नगर :बहुराष्ट्रीय कंपन्या आणि काही देशी भांडवलदार यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या ऑनलाईन शॉपिंग बिजनेसमध्ये आता आणखी एक नवे नाव जोडले जाणार आहे. होय, हे नाव अजिबात इंग्रजी नाही. आपल्या मातीत रुजलेले आणि मराठमोळ्या स्वदेशी तरुणांचे हे स्टार्टअप आहे. त्याचे नाव आहे ‘खरेदिवाला’.


नावातूनच खरेदीदारांच्या हितासाठी प्राधान्य देण्याचा उद्देश या स्टार्टअपचा असल्याचे स्पष्ट दिसते. याबाबत माहिती देताना या कल्पनेला सत्यात साकारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संचालक सचिन चोभे यांनी सांगितले की, स्टार प्रो फर्मच्या तरुणांच्या फर्मची ही संकल्पना आहे. संपूर्ण मराठी मातीत रुजलेले हे पहिलेवहिले असे ई कॉमर्स स्टार्टअप असेल. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळेल. तसेच याद्वारे काहींना पैसे कामाविण्याचीही संधी असेल. विशेष म्हणजे सर्वात कमी किमतीत खरेदीचा हा एक विश्वासार्ह पर्याय असेल. यामध्ये उत्पादनांची माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषेत असेल.

याबाबत माहिती देताना संचालक महादेव गवळी यांनी सांगितले की, www.kharediwala.com हे एक असे स्टार्टअप आहे जिथे शेअर आणि रेफर करण्यासाठीची एक खास यंत्रणा निर्माण केली आहे. प्रत्येक पोस्टल पिनकोडसाठी एक यानुसार एक ‘खरेदिवाला सीएससी’ देण्यात येणार आहे. त्यांना याद्वारे फ़क़्त मोबाईलच्या मदतीने पैसे कमावता येतील. आम्ही या पोर्टलवर मोबाईल, अक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सर्व प्रकारचे कपडे, डिजिटल गॅजेट्स, कार सजावटीच्या वस्तू, फार्मिंग टूल्स, होम केअर आणि ब्युटी केअर यांच्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. कोणालाही यामध्ये आपल्या वस्तू विक्री करण्याची इच्छा असल्यास त्यांनीही या ०७७७००१२०२० मोबाईल किंवा kharediwala.india@gmail.com या इमेलवर संपर्क करावा.


Post a Comment

0 Comments