यशस्वीनी ब्रिगेडच्या रेखाताई जरे यांची हत्या

यशस्वीनी ब्रिगेडच्या  रेखाताई जरे यांची हत्या 


वेब टीम नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. हल्ल्यात जखमी झालेल्या रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेखा जरे आपल्या कारने  पुण्याकडून अहमदनगरला येत होत्या. यावेळी हायवेवर जातेगाव फाट्या जवळ रात्री आठ वाजेच्या दरम्यान दुचाकीने त्यांची कार अडविली आणि  दुचाकीवरस्वार हल्लेखोराने धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर हल्ला केला आणि तेथून पळ काढला.

रेखा जर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉकटरानी  घोषित केले. 

पोलीस सध्या दुचाकीस्वाकाचा शोध घेत आहेत. यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. तपासासाठी पोलीस हायवेवर असलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासून पाहत आहेत. घटनेची माहिती मिळताच आ. संग्राम जगताप पोलिस उपाधिक्षक विशाल ढुमे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. 
Post a Comment

0 Comments