रक्ताला जात, धर्म नसते

रक्ताला जात, धर्म नसते 

सोमा भोजने : टायगर ग्रुपच्या रक्तदान शिबीरास युवकांचा प्रतिसाद

वेब टीम नगर - टायगर ग्रुपच्या वतीने केडगाव येथील अंबिका बस स्टॉप शेजारील जिल्हा परिषदेच्या शाळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष बंटी भिंगारदिवे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी अण्णा गायकवाड, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, नगरसेवक विजय पठारे, संग्राम कोतकर, प्रशांत गायकवाड, विनोद जोंधळे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर, सोमा भोजने, शुभम जाधव, तुषार शिंदे, जनार्दन भोजने, योगेश अंधारे, सचिन भिंगारदिवे आदींसह टायगर ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

कोरोनाच्या संकटकाळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पै. तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबून रहावे लागते. रक्ताला जात, धर्म नसते. कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी या शिबीराचे आयोजन केले असल्याचे शिबीराचे आयोजक सोमा भोजने यांनी सांगितले. युवकांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उपस्थितांनी कौतुक केले. रक्तदात्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शिबीर यशस्वी करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीचे सहकार्य लाभले.Post a Comment

0 Comments