भाजप सरकार मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी

भाजप सरकार मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी

आ.सुधीर तांबे : तर काँग्रेस सामान्यांच्या पाठीशी  

वेब टीम नगर : केंद्रातील भाजप सरकार हे या देशातील म मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी आहे. तर काँग्रेस पक्ष हा समाजातील सर्वसामान्य घटकांच्या पाठीशी आहे. कामगार विरोधी कायद्याच्या माध्यमातून कामगारांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष करत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे. 

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. माजी महापौर दिप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख, सेवादल विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

आ. तांबे म्हणाले की नगर शहरालगत असणाऱ्या एमआयडीसी मधील कामगारांच्या स्वाक्षरी गोळा करण्याच्या मोहिमेला शहर काँग्रेसने चांगला वेग दिला आहे. या माध्यमातून कामगारांना नोकरी बाबतची सुरक्षितता कायम राहावी यासाठी केंद्राच्या काळ्या कामगार कायद्याला विरोध करत काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.

यावेळी मनोज गुंदेचा, खलील सय्यद, विशाल कळमकर, रियाज शेख, नलिनीताई गायकवाड, प्रमोद अबुज, अनिस चुडीवाल, अमित भांडण, शानूभाई शेख, प्रवीण गीते, चिरंजीव गाढवे, देवेंद्र कडू, इम्रान बागवान, अक्षय कुलट, संदीप पुंड, विवेक केकान, प्रशांत वाघ, प्रशांत जाधव, ॲड.अजित वाडेकर, ॲड.सुरेश सोरटे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 






Post a Comment

0 Comments