आरोग्य आहार

आरोग्य आहार 

नाचणीची तिखट पानगी 

साहित्य : २ वाटी नाचणी सत्व , १ चमचा तेल , मीठ , जिरे,ओवा,तीळ,मटार छोटी अर्दी वाटी, स्वीट कॉर्न अर्धी वाटी,चीज , आलेलसूण पेस्ट, १ बटाटा , चाट मसाला, पावभाजी मसाला , साखर, लिंबू. 

तयारी : मटार आणि स्वीट कॉर्न वाफवून घेणे, चीज किसून ठेवणे , आलेलसूण पेस्ट करणे, १ बटाटा उकडून घेणे. 

कृती : प्रथम २ वाटी नाचणी सत्व ,१ चमचा तेल व चावीपुरते मीठ,जिरे, ओवा भरड घालून मळून घेणे . हे पीठ झाकून अर्ध्यातासासाठी बाजूला ठेवणे. 

एका कढईत थोडे तेल घेऊन फोडणी करून त्यात आलेलसूण पेस्ट, वाफवलेले मटार , वाफवलेले स्वीट कॉर्न टाकू एक वाफ आणणे. त्यानंतर उकडलेला बटाटा , मीठ,चाट मसाला , पावभाजी मसाला , चवीपुरते मीठ , साखर लिंबू टाकणे व एक वाफ आणणे व गार करायला ठेवणे. 

तेलाच्या हाताने नाचणीच्या पिठाचे गोळे करणे पुरीच्या आकाराएवढे लाटणे , लाटतांनाच तीळ भुरभुरणे , परत थोडेसे लाटणे म्हणजे तीळ चिटकून राहतील.पुरीवर १ चमचा तयार सारण ठेवा व त्यावर दुसरी पुरी ठेवा व ती प्रेस करा. पुरीच्या सर्व कडा प्रेस करून केळीच्या पानावर हि पानगी ठेव व तव्यावर खरपूस भाजून सर्व्ह करणे. 

टीप: नाचणी , सर्व भाज्या तसेच न तळता शॅलो फ्राय केल्यामुळे हि डिश खूप पौष्टिक होते. 

अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak

Post a Comment

0 Comments