आरोग्य आहार

आरोग्य आहार 

 दलिया कटलेट 


साहित्य : १/२ वाटी दलिया , १ छोटा बटाटा , १/२ जाड पोहे , १/२ वाटी मटार , १/२ स्वीट कॉर्न , १/२ वाटी जागर किस , प्रमाण सर्व लहान वाटीच्या मापाने घ्यावे. १ चमचा आलं लसूण पेस्ट , ३-४ मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा , थोडी कोथिंबीर , पुदिना , लिंबू , मीठ, साखर थोडा बारीक रवा . 

कृती : १/२ वाटी शिजवून घ्यावे , सर्व भाज्या बारीक चिरून वाफ आणून घेणे . बटाटा उकडून स्मॅश करून घेणे . १/२ वाटी जाड पोहे जास्त पाणी घालून  भिजवून ठेवणे. कांदा , कोथिंबीर , पुदिना , बारीक चिरून ठेवणे. शिजवलेला दलिया , वाफवलेलय भाज्या उकडून स्मॅश केलेला बटाटा, भिजवलेले पोहे , आले-लसूण पेस्ट बारीक चिरलेला कांदा , कोथिंबीर, पुदिना, लिंबू रस , चवीपुरती साखर , मीठ . सर्व एकत्रित करून चांगले मळून घेणे . त्यानंतर छोटे छोटे गोळे करून घेणे , वेगवेगळ्या आकारात कटलेट करून , रव्यामध्ये घोळवून शॅलो फ्राय करणे . 

चिंच गूळ खजुराच्या चटणी बरोबर सर्व्ह करणे . 


 

Post a Comment

0 Comments