करोना रुपी भव्य रावणाचे दहन

करोना रुपी भव्य रावणाचे दहन 

गौरीशंकर मित्रमंडळाच्या उपक्रम

वेब टीम नगर - विजयादशमी निमित्त शहरातील गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्ट च्या वतीने १० फुटी करोना रुपी भव्य रावणाचे दहन करून गेल्या ९ दिवसापासून चालू  असलेल्या नवरात्र  उत्सवाची सांगता केली. मंडळाचे संस्थापक वसंत लोढा यांच्या हस्ते रावण दहन झाले. यावेळी एल.जी गायकवाड, सदाभाऊ शिंदे, मंडळाच्या अध्यक्षा आरती आढाव, संजय वल्लाकट्टी, सागर शिंदे, विनोद दिकोंड  आदी उपस्थित होते. 

             यावेळी वसंत लोढा म्हणाले, जेव्हा जेव्हा भक्तांवर संकट येते तेव्हा जगदंबा माता धावून येती. सध्या आलेल्या करोनाच्या संकटातूनही जगदंबामाता सर्व भक्तांना सोडवणार आहे. त्यासाठी आज करोना रुपी रावणाचे दहन केले आहे. 

Post a Comment

0 Comments