पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपचे काम अधिक प्रभावी होईल - दिलीप गांधी

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात 

भाजपचे काम अधिक प्रभावी होईल - दिलीप गांधी



     वेब टीम नगर- सर्वसामान्यांचे नेतृत्वाचा स्व.गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे या चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन त्यांची कार्याची दखल घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले.


     भाजपाच्या नूतन राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे या गोपीनाथ गड येथील दसरा मेळावा संपन्न करुन पुण्यात जात असतांना माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी थांबल्या होत्या. यावेळी दिलीप गांधी, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी पंकजा मुंडे यांचे स्वागत केले.


     पंकजा मुंडे म्हणाल्या, बर्‍याच दिवसांनी नगरला थांबण्याचा योग आला. दिलीप गांधी कुटूंबियांशी मुंडे कुटूंबियांचे घनिष्ठ संबंध आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकरीही अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत संकटकाळात जनतेला करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेले पॅकेजचे मी स्वागत करते मात्र याहून अधिक मोठे पॅकेज देणे अपेक्षित होते. केंद्र सरकारही मोठी मदत सर्व जनतेला या संकटकाळात करत आहे.


     यावेळी आशिष अनेचा, यश शर्मा, डॉ.रवींद्र खेडकर, डॉ.ज्ञानेश्‍वर दराडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments