तिळवण तेली समाज ट्रस्टच्या मंदिरात नऊ दिवस देवीची विविध रुपे

 तिळवण तेली समाज ट्रस्टच्या मंदिरात नऊ दिवस देवीची विविध रुपे



  वेब टीम   नगर : तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने दाळमंडई येथील विठ्ठल - रुख्मीणी मंदिर  दरवर्षीप्रमाणे याही नवरात्रोत्सवात स्थापन करण्यात आलेल्या देवीच्या मूर्तीची वेगवेळ्या आसनामध्ये पुजा बांधण्यात येत असते. नऊ दिवस वेगवेगळ्या पुजा बांधण्यात येतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थित घटस्थापना करुन देवी पूजा करण्यात येत होती, अशी माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा नागले यांनी सांगितले.

 नवरात्रोत्सवात देवीची नित्योपचार पुजा व आरती, ललित पंचमी, रथ अलंकार महापूजा, शेषशाही महापूजा, सप्तशदी सामुहिक पाठ, भवानी तलवार अलंकार महापूजा, दुर्गाष्टमीच्या दिवशी महिषासूर मर्दिनी  महाअलंकार पुजा, होम-हवन, पूर्णाहूत, विजया दशमीच्या दिवशी समोलंघन आदि कार्यक्रम होतात. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर भाविकांसाठी मंदिरे बंद असल्याने ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी सदर नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रम सोशल मिडियाच्या माध्यमातून भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध करुन दिली आहेत, असे उपाध्यक्षा निता लोखंडे यांनी सांगितले. 

यासाठी  उपाध्यक्षा निता लोखंडे, सचिव सचिन शेंदूरकर, खजिनदार प्रकाश सैंदर, विश्‍वस्त प्रसाद शिंदे, सागर काळे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर आदिंसह सभासद परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments