कॅन्टोन्मेंट बोर्डचा कायदा रद्द झाला पाहिजे

  कॅन्टोन्मेंट बोर्डचा कायदा रद्द झाला पाहिजे 

 खा. विखे : भिंगारमध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना शिफारसपत्रांचे वाटप

वेब टीम नगर :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वसामान्य जनतेसाठी ज्या लाभाच्या योजना सुरु केल्या त्या सर्व योजना भाजपचे पदाधिकारी जनते पर्यंत घेऊन जात पंतप्रधानाचे स्वप्न पूर्ण करत आहेत. याचा मला अभिमान आहे. ज्या लाभार्थीना आज शिफारस पत्र मिळाले आहेत त्यांना येत्या ५-६ दिवसात खात्यात १० हजार जमा होवून त्यांना आपला व्यवसाय सुरु करता येईल.  भिंगार छावणी परिषदेच्या प्रलंबित प्रश्नांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. २०२० पासून भिंगार वासीयांवर घरपट्टी वाढीचा बोजा परिषदेने टाकला आहे. आधीच सर्व जनतेचे करोना व लॉकडाऊन मुळे उत्पन्न नसल्याने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे या घरपट्टी वाढीस माझा विरोध असून त्वरित रद्द करण्याची शिफारस दिल्लीत करणार आहे. राष्ट्रीय महामार्ग २२२ चा प्रश्न प्रलंबित आहे. बोगस ठेकेदारामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.  जानेवारी पर्यंत भिंगारचे नागरिक मोकळ्या रस्त्याने जाऊ शकतील यासाठी भिंगार अर्बन बँक ते वेशी पर्यंतचा रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रुंदीकरण व डांबरीकरणाचा प्रश्न सोडवणार आहे. मतदान घेण्यासाठी राजकारण केले नाही तर सार्वत्रिक विकासा करणार आहे. आ. संग्राम जगताप यांच्याशीही चर्चा करणार आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलीप गांधी यांनी पाईपलाईन साठी निधी मंजूर केला आहे. त्याच्या पूर्ततेसाठी मी पाठपुरावा करत हाही प्रश्न जानेवारी पर्यंत सुटून एमआयडीसी मधून  भिंगारसाठी स्वतंत्र पाईपलाईन केली जाईल. भिंगार मधील पोलीस स्टेशनची जागा चुकीची आहे. त्याचे स्थलांतरासाठी नव्या पोलीस अधिक्षकांना भेटणार आहे. छावणी परिषदेमुळे भिंगारचा विकास खुंटला आहे. कॉंन्टेमेंट बोर्डचा उपोयोग काय. म्हणून कॉंन्टेमेंट बोर्डचा कायदा रद्द झाला पाहिजे.  यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यानंच नगरला आणल्याशिवाय संरक्षण खात्याकडे असलेले प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.

भिंगार शहर भाजपच्या वतीने छावणी परीदेच्या माध्यमातून सर्वे करून निवडण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या २० लाभार्थीं पथविक्रेत्यांना शिफारसपात्रांचे वाटप पथविक्रेत्यांना शिफारसपात्रांचे  खा. सुजय विखे, माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या हस्ते भिंगार छावणी परिषदेच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी मुख्याकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, उपाध्यक्ष प्रकाश फुलारी, भिंगार भाजपा मंडल अध्यक्ष वसंत राठोड, नगरसेविका शुभांगी साठे, संजय छजलानी, रवींद्र लालबोंद्रे, भाजपा उपाध्यक्ष शिवाजी दहीहंडे, सरचिटणीस महेश नामदे, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, गणेश साठे, राकेश भाकरे, जोतस्ना मुंगी, लक्ष्मिकांत तिएअरि, बिजेस लाड, सचिन दरेकर, महेश झोडगे, वैशाली कटोरे, सलीम बागवान, पोलीस उपनिरीक्षक पाटील आदी उपस्थित होते.

दिलीप गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करोना संकट काळात चंगल्या योजना आणून जनतेला मोठा आधार दिला आहे. सावकारीच्या पाशातूनसोडवणारी व तुम्हाला आत्मनिर्भय करणारी ही प्रधानमंत्री स्वनिधी योजना  आहे. बँकेचे पैसे वेळेवर फेडले तर बँक तुमच्या पाठीशी उभी रहात पाच लाख पर्यंत कर्ज देइल. यातून तुम्ही कोणताही व्यवसाय सुरु करू शकाल. १३० कोटी जनते पैकी कोणताही मनुष्य भिक मागणार नाही हे मोदींचे स्वप्न आहे. म्हणून सर्वांना स्वाभिमानाने उभे करत आत्मनिर्भय भारत करत आहेत.  कॉंन्टेमेंट बोर्डचा असल्याने भिंगारला राज्य सरकारच्या योजनाचा लाभ होत नव्हता. मात्र खासदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये मी हा अधिकार मिळवून दिला आहे. चटई क्षेत्राचा  प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. कॉंन्टेमेंट बोर्डकडे भरपूर जागा उपलब्ध आहे. म्हणून नव्या उत्पन्नचे साधन निर्माण करण्याचे धाडस करावे.

प्रास्ताविकात वसंत राठोड यांनी या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना मिळणाऱ्या लाभाची सविस्तर माहिती दिली. भिंगार भाजपाच्या वतीने छावणी परिषदेच्या सहकार्याने शहरात सर्वे करून लाभार्थी निवडले आहेत. आज त्यातील काहींना शिफारस  पत्रे देत आहोत. असे सांगितले.

दिलीप गांधी यांनी मंजूर केलेली कामे मी आज पूर्णत्वास नेते आहे : खा. विखे

दिलीप गांधी यांनी गेल्या अनेक वर्षापासून दक्षिण मतदार संघाच्या विकासासाठी प्रदीर्घकाळ काम केले आहे. पक्षाचे चांगले संघटन बांधले. खासदार असतांना दिलीप गांधी यांनी जे कामे कामे मंजूर करून आणली त्या विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी आज जे कामे करतोय ते सर्व दिलीप गांधी यांनीच मंजूर केली आहेत. मी फक्त धक्का देवून पूर्वत्वाकडे नेत आहे हे मी कबुल करतो. दिल्लीत त्यांच्या ओळखीचा फायदा होत आहे. शहरातील उढ्ढाणपुलाचे कामही गांधी यांच्यामुळेच झाले. मी ते पूर्ण करणार आहे.

Post a Comment

0 Comments