ऑनलाईन लक्षकुंकूमार्चान पुजा विधीस विविध जिल्ह्यातून भाविकांचा प्रतिसाद

 ऑनलाईन लक्षकुंकूमार्चान पुजा विधीस विविध 

जिल्ह्यातून भाविकांचा प्रतिसाद

वेब टीम नगर: नवरात्र उत्सवात ललिता पंचमीला दरवर्षी नगरचे घनपाठी वेदमूर्ती सागरशास्त्री कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षकुंकूमार्चान पूजाविधीचे आयोजन होत असते. मात्र यावर्षी आलेल्या करोनाच्या महामारीमुळे अद्याप मंदिरे बंद असल्याने व करोनाचे सावट कायम असल्याने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करत वेदमूर्ती सागरशास्त्री कुलकर्णी यांनी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करत हा लक्षकुंकूमार्चान पूजाविधी केला. या ऑनलाईन पूजा विधीत नगर सह पुणे, नाशिक, सोलापूर, इचलकरंजी, संगमनेर, पंढरपूर, औरंगाबाद, अकलूज, जामनगर, येवला, चाळीसगाव आदी ठिकाणाहून १५० हून अधिक महिला, कुमारिका व पुरुष भाविक ऑनलाइन सहभाग घेऊन आपल्या कुलदेवीची उपासना केली. सुरुवातीला प्रधान संकल्प, पुण्याह वाचन, देवीचे पूजन, श्री सुक्त व देवीच्या सहस्त्र नावांनी सहभागी भाविकांनी विधिवत कुंकूमार्चन केले. वेदमुर्ती सागरशास्त्री कुलकर्णी गुरुजी व त्यांचे चिरंजीव सोहम कुलकर्णी यांनी कर्माचे पौरोहित्य केले. स्मिता कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

  यावेळी कुंकुमार्चान विधीचे महत्व व  फलश्रुतीची माहिती संयोजक सागरशास्त्री कुलकर्णी यांनी ऑनलाईन सहभागी झालेल्या भाविकांना दिली. ते म्हणाले, देवीचे महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती हे तिन्हे रुपे स्त्रीमध्ये आहेत. नवरात्रामध्ये कुंकूमर्चानास सर्वाधिक महत्व आहे. यावर्षी आलेल्या करोनाच्या संकटातून सर्व भविकांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी जगदंबादेवीच्या चरणी प्रार्थना केली आहे.

Post a Comment

0 Comments