आरोग्य आहार

आरोग्य आहार 

 उपवासाचे न्यूट्रीलड्डू 

साहित्य: १ वाटीशेंगदाणे ,१ वाटी बिया काढलेले खजूर ,पाव वाटी बदाम , पाव वाटी अक्रोड मगज , पाव वाटी गूळ आणि एक वाटी खोबऱ्याचा किस . 

कृती : शेंगदाणे भाजून जाडसर वाटून घ्यावेत. बदाम आणि अक्रोड मगज जाडसर वाटून घ्यावे . खोबरं किस मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावा किंवा तसाच वापरला तरी चालेल. खजूर व गुळ बारीक करून घ्यावे आणि वरील मिश्रणात घालावेत . खजूर असल्यामुळे गूळ कमी लागतो त्याच प्रमाणे खजुराचा ओलसरपणा असल्याने तुपाची गरज भासत नाही. वरील सर्व मिश्रण एकजीव करून छोटे छोटे लाडू वळावेत मधल्या वेळेत मुलांना देण्यासाठी हा खाऊ उत्तम आहे. 


पोषणमूल्ये : सर्व सुकामेवा ,गूळ  शेंगदाणे यामुळे लाडू खूप पौष्टिक होतात .

अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog ShikshakPost a Comment

0 Comments