।। जागर शक्तीचा ।। जागर नवदुर्गांचा ।।
महागौरी
हिंदू पुराणकथेनुसार , देवी शैलपुत्री तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी दिसायला खूप सुंदर आणि शुभ्र कांतीची होत. तिच्या ह्याच गौरवर्णामुळे तिला देवी महागौरी म्हणून ओळखले जायचे.
पूजन :
देवी महागौरीचे पूजन नवरात्रीच्या आठव्या दिवशी केले जाते.
अधिपत्यातील ग्रह:
राहू ग्रहावर देवी महागौरीची सत्ता असल्याचे मानले जाते.
देवीचे वर्णन:
देवी शैलपुत्री आणि देवी महागौरीचे वाहन नंदी असल्याने महागौरीलादेखील वृषारूढा म्हणतात . महागौरी चतुर्भुज असून एका उजव्या हातात त्रिशूल तर दुसऱ्या उजव्या हात अभय मुद्रेत असतो आणि एका डाव्या हातात डमरू घेतला असून दुसऱ्या डावा हात वरद मुद्रेत असतो.
तिच्या नावाप्रमाणे गौरवर्णाच्या महागौरीची तुलना शंख,चंद्र आणि कुंद नावाच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांशी केली जाते. शुभ्र वस्त्र धारण केल्याने महागौरीला श्वेतांबरधरा देखील म्हणले जाते.
देवी कालरात्री प्रमाणे महागौरीला देखील रातराणीची फुले प्रिय आहेत.
मंत्र:ॐ देवी महागौर्यै नमः॥
प्रार्थना :
श्वेते वृषेसमारूढा श्वेताम्बरधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा॥
स्तुती :
या देवी सर्वभूतेषु माँ महागौरी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
देवी ध्यानम:
वन्दे वाञ्छित कामार्थे चन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारूढा चतुर्भुजा महागौरी यशस्विनीम्॥
पूर्णन्दु निभाम् गौरी सोमचक्रस्थिताम् अष्टमम् महागौरी त्रिनेत्राम्।
वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजेम्॥
पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालङ्कार भूषिताम्।
मञ्जीर, हार, केयूर, किङ्किणि, रत्नकुण्डल मण्डिताम्॥
प्रफुल्ल वन्दना पल्लवाधरां कान्त कपोलाम् त्रैलोक्य मोहनम्।
कमनीयां लावण्यां मृणालां चन्दन गन्धलिप्ताम्॥
स्तोत्र :
सर्वसङ्कट हन्त्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाम्यहम्॥
सुख शान्तिदात्री धन धान्य प्रदायनीम्।
डमरूवाद्य प्रिया अद्या महागौरी प्रणमाम्यहम्॥
त्रैलोक्यमङ्गल त्वंहि तापत्रय हारिणीम्।
वददम् चैतन्यमयी महागौरी प्रणमाम्यहम्॥
देवी कवच :
ॐकारः पातु शीर्षो माँ, हीं बीजम् माँ, हृदयो।
क्लीं बीजम् सदापातु नभो गृहो च पादयो॥
ललाटम् कर्णो हुं बीजम् पातु महागौरी माँ नेत्रम् घ्राणो।
कपोत चिबुको फट् पातु स्वाहा माँ सर्ववदनो॥
0 Comments