मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षपदी कमलेश सप्रा ,उपाध्यक्षपदी आशा सरोदे

मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षपदी कमलेश सप्रा ,उपाध्यक्षपदी आशा सरोदे 

सचिवपदी अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर


   वेब टीम   नगर - घरेलू मोलकरीण व घरगडी संघटना संलग्न आयटकची नुकतीच वार्षिक मिटींग घेण्यात आली. या मिटींमध्ये मोलकरीण साठी मंडळ स्थापन करुन त्यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली व सर्व इतर बांधकाम कामगारांना असणारी सुविधा देण्याचेही ठरविण्यात आले.

     यावेळी नूतन पदाधिकार्‍यांच्या सर्वोनुमते निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कमलेश सप्रा यांची तर उपाध्यक्षपदी आशा सरोदे व सचिव म्हणून कॉ.सुधीर टोकेकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारी सदस्य - अलका नंदू वाळके,पुष्पा विलास हापसे, भारती राजू वाळके, अनिता शरद भिंगारदिवे आदिंची निवड करण्यात आली.


     यावेळी बोलतांना अ‍ॅड.सुधीर टोकेकर म्हणाले, २००९ च्या सरकार ने घरेलू मोलकरीणसाठी काही सुविधा लागू केल्या होत्या. ज्यात घरेलू महिला वर्षांचे पुढे आहेत, त्यांना १० हजार सन्मान निधी म्हणून दिला जात होता, परंतु २०१४ नंतर ही योजना भाजपा सरकार काळात बंद झाली, त्यामुळे घरेलू मोलकरीणसाठी कोणताही संरक्षक मंडळ अथवा कायदा नाही, म्हणून ज्यांचेवर अन्याय होत असून, त्यांची परिस्थिती दयनीय आहे. नुकतेच केंद्र सरकारने घरेलू मोलकरीण यांचे सर्व्हेक्षण करण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल धन्यवाद देऊन आपले हक्क मिळविण्यासाठी संघटनेच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

     नूतन अध्यक्षा कमलेश सप्रा यांनी संघटनेच्या कार्यात आपण योगदान देऊन घरेलू कामगारांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहू, असे सांगितले. शेवटी उपाध्यक्षा आशा सरोदे यांनी आभार मानले. विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे कार्य वाढविण्याचे ठरविण्यात आले.



Post a Comment

0 Comments