आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

राजगिरा रताळे दशमी


साहित्य: भाजून दळून आणलेले राजगिरा पीठ दोन वाटी, दोन मोठे रताळे, पाऊण वाटी गूळ, वेलची पावडर, साजूक तूप. 

कृती: प्रथम रताळी उकडून मॅश करून घ्यावेत. त्याच प्रमाणे गूळ किसून घ्यावा. उकडलेल्या रताळ्याच्या गरामध्ये गुळ अर्धा तास विरघळू द्यावा. विरघळल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यावे. त्यामध्ये बसेल इतकेच राजगिरा पीठ, वेलची पावडर, चिमुटभर मीठ, दोन-तीन चमचे साजूक तूप मोहन म्हणून घालावे व पीठ चांगले मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून साजूक तुपावर खरपूस भाजून घ्यावे. ही दशमी लाटताना जरा जाडसरच लाटावी. पातळ लाटल्या तर कडक होतात.


पोषणमूल्ये : राजगिरे मुळे कैल्शियम, लोह त्याचप्रमाणे रताळ्या मुळे विटामिन बी सिक्स ,फायबर, गुळा मधील लोह सुद्धा मिळते. खूपच पौष्टिक डिश तयार होते. शिवाय प्रवासात देण्यासही उत्तम.


अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak

Post a Comment

0 Comments