युवक काँग्रेस, एनएसयूआयच्या जिल्हा दौऱ्याचा अहवाल

युवक काँग्रेस, एनएसयूआयच्या जिल्हा दौऱ्याचा अहवाल ना. बाळासाहेब थोरात यांना  सादर

लवकरच पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर होणार 

  वेब टीम नगर : जिल्ह्यात युवक आणि विद्यार्थी संघटना बांधणीसाठी युवक काँग्रेस आणि एनएसयुआयचा जिल्हा दौरा नुकताच पूर्ण झाला आहे. 

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेस - एनएसयूआयचे जिल्हा समन्वयक किरण काळे, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा यांनी हा दौरा पूर्ण करत मुंबईत प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची समक्ष भेट घेऊन जिल्हा दौऱ्याचा अहवाल सादर केला आहे. 

ना. बाळासाहेब थोरात, सत्यजीत तांबे यांच्या आदेशावरून हा दौरा करण्यात आला होता. अकोले पासून सुरू झालेल्या दौऱ्याचा शेवट पारनेर तालुक्यामध्ये झाला. शेवगाव, पाथर्डी, नेवासा येथील तालुक्यांची बैठक जिल्हा मुख्यालय ठिकाणी घेण्यात आली. 

या दौऱ्याला युवक, विद्यार्थ्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये मोठा प्रतिसाद दिला. यावेळी झालेल्या मेळाव्यांना, बैठकांना युवकांची मोठी उपस्थिती होती. दौऱ्यामुळे दोन्ही संघटनांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील रिक्त असणारे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या नियुक्त्या तसेच दोन्ही संघटनांची जिल्हा कार्यकारिणी या दौऱ्यानंतर घोषित होणार आहेत. जिल्हाध्यक्ष निवडीचा देखील विषय आहे. यामुळे इच्छुकांच्या नजरा आता निवडीच्या घोषणेकडे लागल्या आहेत. 

अकोले, कर्जत, पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. वर्षभरावर आलेली जिल्हा परिषदेची निवडणूक देखील महत्त्वाची असणार आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 

या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस, एनएसयूआयच्या संघटनात्मक बांधणीसाठी काँग्रेसच्यावतीने जोर देण्यात आला आहे. या निवडणुका समोर डोळ्यासमोर ठेवतच हा दौरा काँग्रेसच्या युवा नेत्यांनी पूर्ण केला आहे. 

मुंबईत  बाळासाहेब थोरात, सत्यजीत तांबे यांची समक्ष भेट घेऊन काळे, दिवटे, पापडेजा यांनी तालुकानिहाय काय परिस्थिती आहे याचा सविस्तर आढावा देत इच्छुकांच्या संभाव्य नियुक्त्या बाबत चर्चा केली आहे. या बाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काळे, दिवटे, पापडेजा त्रिमूर्तींचे नेत्यांकडून कौतुक 

युवक, विद्यार्थी संघटनेचा जिल्हा दौरा करत दोन्ही संघटनांमध्ये चैतन्य निर्माण केल्याबद्दल ना.बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे यांनी किरण काळे, सोमेश्वर दिवटे, निखील पापडेजा या त्रिमूर्तींचे

कौतुक केले आहे. आगामी काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या त्रिमूर्तींवर महत्त्वाची जबाबदारी निवडणुकीसाठी सोपविली जाणार असल्याचे संकेत यावेळी नेत्यांनी दिले आहेत. 


Post a Comment

0 Comments