आर.बी भोसले नगरचे नवे जिल्हाधिकारी

आर.बी भोसले नगरचे नवे जिल्हाधिकारी

 वेब टीम नगर: अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली असून आर.बी.भोसले आता नगरचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.महाराष्ट्रातील आय.ए.एस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात नगरचे जिल्हाधिकारी म्हणून भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. द्विवेदी यांना अद्याप कोणत्या ठिकाणी  नियुक्ती दिली ते कळू शकले नाही.जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या गत महिन्यात बदल्या झाल्या द्विवेदी यांना ही तीन वर्षे पूर्ण झाली होती.त्यामुळे त्यांचीही बदली अपेक्षित होती त्यांनी सीना नदी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली तसेच भोसले हे यापूर्वी नगरला अतिरिक्त जिल्हाधिकारी होते.  पूर्वी ते सोलापूरचे जिल्हाधिकारी होते.

Post a Comment

0 Comments