।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।।

।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।।

आयुष्याचा मुक्त प्रवास करणारी रणरागिणी ‘संपुर्णाताई सावंत ’


समाजासाठी प्रेरणादायी ठरलेली संपुर्णाताई  ही आजच्या काळातील नवदुर्गाच. 

आयुष्याचे स्वत्व ओळखून त्यानुसार प्रवास करत, आपल्या कार्याची पावती जगाकडून घेण्याऐवजी स्वतः स्वतःला ओळखून स्वतःची मतं तयार करून मनमोकळे, मनमुराद, यथेच्छ जगणारी रणरागिणी म्हणजे अहमदनगर शहरातील यशवंती मराठा बचत गटाच्या विद्यमान अध्यक्षा  संपुर्णाताई  किसनराव सावंत..

 ‘तुमचं बोलणं, चालणं, वागणं, एखाद्या विषयी मत मांडण्याची शैली यातून तुमचं व्यक्तिमत्व इतरांच्या लक्षात राहतं’ हा यशस्वी आयुष्याचा मूलमंत्र त्या सहज सांगतात

समाजातील “तूमचे तुम्ही,आमचे आम्ही जगण्याचं आज गणित झालंय,माणुसकीतला ‘मी’ माझ्यातली “माणुसकी’शोधणं,म्हणूनच आज कठीण झालंय”.

या ओळीतल्या भावार्थाप्रमाणे समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतुन समाजसेविका संपुर्णाताई सावंत  यांनी अनेक वर्षांपासून विविध सेवाभावी संसस्थेच्या माध्यमातून  सुरूवात केली. या माध्यमातून,वृक्षारोपण व संवर्धन, अनाथ मुलांना मदत, बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच .

रुग्ण सेवेत नेहमी स्वयंसेवी संस्थेच्या च्या माध्यमातून ते शासकीय रुग्णालयात कितीतरी अपघातग्रस्त रुग्णांसाठी देवदुत बनले आहे.स्वताच्या खिशाला झळ सोसून फक्त औषधी व रक्तासाठी पैसै नाही म्हणून, विक्रीला काढलेले  महिलांचे मंगळसूत्र वाचविले आहे. लायन्स क्लब च्यावतीने दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम,आयोजित करण्यात स्वतः पुढकार घेत आहेत. खरोखर गरज असणाऱ्या आणि ज्या ठिकाणी अन्य संस्थांची मदत पोहचत नाही, अशा  महिला धुणीभांडी, जेवण, स्वच्छता करणे इत्यादी कामे करून आपल्या कुटुंबातील सदस्यांचे पोट भरतात. तोच पैसा हाताला काम नसल्याने पुर्णपणे ठप्प झाला. घरातील किराणा संपला आहे. पुर्वी जेथे महिला काम करत होत्या, तेथे पुन्हा कामाला येऊ का? जेणे करून आमचे दोन वेळचे पोट तरी भरेल. असी विचारणा करत आहेत. परंतु,  लॉकडाऊन सुरु असताना सगळे काही ठप्प झाले अन् त्यात घरकाम करणाऱ्या महिलांवर मोठा डोंगर कोसळला.

घरकामगार महिलांवर कोसळलेला डोंगर भरून काढण्यासाठी घरकामगार महिलांना लायन्स क्लब च्या माध्यमातून सामाजिक कार्याची आवड निर्माण झाल्याने  वैयक्तिक खर्चातून  घरकामगार महिलांना महिनाभर पुरेल असे अन्नधान्य वाटप करून कोसळलेला डोंगर भरून काढण्याचा प्रयत्न केला असुन.अनेक महिलांना घरगुती कामासाठी स्वतःकडील आर्थिक मदत हि देऊ केली. ही मदत करताना मोकळ्या मनाने गरजूना लायन्स क्लब माध्यमातून व वैयक्तिक स्वरुपात धान्यदी मालाचे  किट वाटण्यात आले. शहारातील अनाथ आश्रमातील मुलांना अनाथांना कपड्याचे वाटप केले .माणसाच्या मूलभूत गरजा अन्न,वस्र,आणि निवारा आहे त्यातील या मुलांना अनाथआश्रमाचा निवारा मिळवला आहे, त्याच ठिकाणी त्यांना अन्न देखील उपलब्ध होते.राहतो  प्रश्न तो वस्रांचा आणि त्याच वस्रांचा प्रश्न मिटवण्याचा असेल ,त्यांना लागणार वर्षाभर किरणा ,किशोरवयीन विद्यार्थी मुलांना सेव्हिंग किट इत्यादी दिल्या आहेत .

आपल्या संस्कृतीत माता-पिता, गुरुजन, मातृभूमी यांच्याप्रमाणे समाजाचेही ऋण मानले जाते. त्यामुळे प्रत्येकाने समाजातील गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करावी, अशी शिकवण आपली संस्कृती देते. योग्य व्यक्तीची निवड करून योग्य कारणासाठी कोणतीही अपेक्षा न करता, लाभाचा विचार न करता मदत करावी, असा व्यापक विचार मांडणारी आपली भारतीय संस्कृती म्हणूनच गौरवली जाते. समाजातील काही संस्था, व्यक्ती या दृष्टीने जागरूकपणे कार्य करीत असतात आणि जाणीवपूर्वक सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत असतात त्या साठी काही शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच, शाळेला साऊंड सिस्टीम,शैक्षणिक साहित्य स्वतः कडून व इतरांकडुन उपलब्ध करुन देण्यात यशस्वी झाल्या आहे तसेच अनेक ठिकाणी वृक्षारोपण करुन वृक्ष संवर्धन केले जात आहेत. ज्या आश्रमातील पारधी समाजातील मुलं आहे त त्यांना त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी साबण, ट्युटपेस्ट,शालेय गणवेश या बरोबर साखर ,तांदुळ आदी वस्तु स्वरुपात भेट दिल्या आहेत . कोपर्डी घटनेनंतर राज्यात मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून अनेक मोर्चे निघाले या काळात पुर्ण वेळ समाज बांधवाना देऊन समन्वयकांची भुमिका योग्य रित्या पार पाडली असुन हे काम सध्याच्या काळात अविराहीत ही जोमाने सुरु आहे.

ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी शांतता व दक्षता समितीच्या माध्यमातून समोपचाराने वाद मिटवण्यावर  भर देऊ सलोखा निर्माण करण्याची हातोटी आहेच ,तसेच जिजाऊ ब्रिगेडची सुत्रे हाती घेतल्यापासुन आजतागायत आपल्या बेधडक कार्याने अनेकांवर क्रांतिकारी छाप पाडणाऱ्या रणरागिणी, महिलांचे संघटन करीत अनेकांना आदर्श निर्माण करणाऱ्या कुशल संघटक, व संघटनेतील या महिलांना ,त्यांच्या अडचणींना अधिक व्यापक तेने समजावून घेत उंबरठ्याबाहेर चे सामाजिक, सांस्कृतिक जगत याची जाणीव करुन देऊन जिजाऊ ब्रिगेडचे कार्य सुरु केले आहे .बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वयंमरोजगार त्यांनी उपलब्ध करुन दिला असुन मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी आंदोलनात सहभाग घेऊन क्रांती मोर्चा वेळी पुर्ण वेळ समन्वयकांची भुमिका पार आहे त्यांच्या सामाजिक योगदानामुळे त्यांना राज्यस्तरीय आदर्श महिला समाज भुषण पुरस्कार २०१८, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, मराठा सेवा संझ प्रणित मराठा नागरी सह.पतसंस्थेचा 'गौरव जिजाऊंचा सन्मान स्री शक्तीचा' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे त्यांचा  बचत गट ,यशवंती मराठा महिला मंडळाचे कार्याध्यक्ष, तसेच लायन्स व लायनेस क्लब  च्या विद्यमान खजिनदार,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा म्हणुन सामाजिक कार्यात योगदान देत आहे त्यांच्या या कार्याला नगर टुडे परीवाराचा सलाम...!

Post a Comment

0 Comments