।। जागर शक्तीचा ।। जागर नवदुर्गांचा ।।

।। जागर शक्तीचा ।। जागर नवदुर्गांचा ।।

चंद्रघंटा


महादेवाचे विवाह झाल्यानंतर देवी महागौरी ने आपल्या भाळी चंद्रकोर शोभायमान करण्यास सुरुवात केली म्हणूनच देवी पार्वतीला देवी चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते. देवी चंद्रघंटा देवी पार्वती चे विवाहित स्वरूप आहे. 

पूजन:

चंद्रघंटा देवीचे पूजन नवरात्रीच्या तिसर्या दिवशी केले जाते. 

अधीपत्त्यातील ग्रह:

 देवी चंद्रघंटा ही शुक्र ग्रहावर अधिपत्य करणारी देवता मानली जाते. 

वर्णन: वाघिणीवर आरूढ झालेली आणि भाळी चंद्रकोर शोभायमान करणारी ही चंद्रकोर घंटा कृती दिसत असल्याने देवीच्या या रुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते.ही देवी दशभुजाधारी असून  त्रिशूल,गदा,तलवार आणि कमंडलू ही आयुधे तिच्या डाव्या बाजूच्या हातात असतात तर डाव्या बाजूच्या पाचवा हात वरद मुद्रेत असतो तर बाण,धनुष्य आणि जपमाळ आदी उजव्या बाजूच्या चार हातात धारण केलेल्या या देवीच्या उजव्या बाजुचा पाचवा हातात अभयमुद्रेत असतो.  देवीचे हे स्वरूप म्हणजे शांततेचे आणि भक्तांसाठी कल्याणकारी असे प्रतीक आहे. या स्वरूपातील देवी युद्धासाठी कायम सिद्ध असते. कपाळावरील चंद्रघंटा ही आपल्या आवाजाचा नादातून भक्तांची संकटे दूर करते. देवी शैलपुत्री आणि देवी ब्रह्मचारिणी प्रमाणे या देवी चंद्रघंटेलाही चमेलीची फुले प्रिय आहेत. 

मंत्र : 

ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः॥

प्रार्थना : पिण्डज प्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।

             प्रसादं तनुते मह्यम् चन्द्रघण्टेति विश्रुता॥

स्तुती : या देवी सर्वभूतेषु माँ चन्द्रघण्टा रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

देवी ध्यानम

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।

सिंहारूढा चन्द्रघण्टा यशस्विनीम्॥

मणिपुर स्थिताम् तृतीय दुर्गा त्रिनेत्राम्।

खङ्ग, गदा, त्रिशूल, चापशर, पद्म कमण्डलु माला वराभीतकराम्॥

पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालङ्कार भूषिताम्।

मञ्जीर, हार, केयूर, किङ्किणि, रत्नकुण्डल मण्डिताम॥

प्रफुल्ल वन्दना बिबाधारा कान्त कपोलाम् तुगम् कुचाम्।

कमनीयां लावण्यां क्षीणकटि नितम्बनीम्॥

स्तोत्र : 

आपदुध्दारिणी त्वंहि आद्या शक्तिः शुभपराम्।

अणिमादि सिद्धिदात्री चन्द्रघण्टे प्रणमाम्यहम्॥

चन्द्रमुखी इष्ट दात्री इष्टम् मन्त्र स्वरूपिणीम्।

धनदात्री, आनन्ददात्री चन्द्रघण्टे प्रणमाम्यहम्॥

नानारूपधारिणी इच्छामयी ऐश्वर्यदायिनीम्।

सौभाग्यारोग्यदायिनी चन्द्रघण्टे प्रणमाम्यहम्॥

देवी कवचं

रहस्यम् शृणु वक्ष्यामि शैवेशी कमलानने।

श्री चन्द्रघण्टास्य कवचम् सर्वसिद्धिदायकम्॥

बिना न्यासम् बिना विनियोगम् बिना शापोध्दा बिना होमम्।

स्नानम् शौचादि नास्ति श्रद्धामात्रेण सिद्धिदाम॥

कुशिष्याम् कुटिलाय वञ्चकाय निन्दकाय च।

न दातव्यम् न दातव्यम् न दातव्यम् कदाचितम्॥


Post a Comment

0 Comments