आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

उपवासाचे शाबुदाण्याचे लाडू 

साहित्य: साबुदाणा पीठ दीड वाटी, एक वाटी खोबरे किस, अर्धी वाटी खारीक पावडर, पाव वाटी बदाम पावडर, पाव वाटी डिंक पावडर, दोन वाटी पिठीसाखर, एक चमचा वेलची पावडर आणि एक वाटी साजूक तूप.

कृती: प्रथम साबुदाणा भाजून त्याचे पीठ करून घ्यावे, खोबरा कीस मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. एका पराती मध्ये साबुदाणा पीठ, खोबरे किस, खारीक पावडर, बदाम पावडर( जाडसर असावी), त्याच प्रमाणे डिंक पावडर, पिठीसाखर वेलची पावडर सगळे एकत्रित करून घ्यावे. त्यामध्ये तूप थोडे थोडे करून टाकावे. व्यवस्थित गोळा झाल्यानंतर छोटे छोटे लाडू वळावेत.

टीप:साबुदाणा ऐवजी राजगिरा लाही पीठ वापरू शकतो.सर्व साहित्य वरील प्रमाणे घेऊन फक्त साखरेऐवजी गूळ वापरावा.दोन्ही लाडू खूप चविष्ट व पौष्टिक होतात.

Post a Comment

0 Comments