तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याज

तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याज 


ए.डी.सी.सी बँकेचा जनहिताचा निर्णय 

 वेब टीम नगर-  कोरोना महामारी ते संकट व त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने घेतले आहेत त्यात आता कर्जदार शेतकरी सभासदांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून दिले जाणार आहे असा क्रांतीकारी निर्णय बँकेने घेतला असून या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर उपाध्यक्ष रामदास वाघ व राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेतील व्याज सवलतीबाबत संभ्रम निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या परंतु शेतकर्‍यांना जिल्हा बँकेमार्फत हे कर्जत शुन्य टक्के दराने उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांनी नियमित व्याजासह पीक कर्जाचा वेळेत भरणा केला असल्यास त्यांच्यापैकी त्यापैकी तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे रकमेवर शासनाकडून दिला जाणार व्याज  परतावा हा थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 



Post a Comment

0 Comments