आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

राजगिरा थालीपीठ



साहित्य: राजगिरा पीठ दोन वाटी, तीन छोटी काकडी, हिरवी मिरचीचे वाटण, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट दोन चमचे, जिरे पावडर, मीठ, साजूक तूप

कृती: प्रथम राजगिरा चांगल्या ला ह्या होईपर्यंत भाजून घ्यावा आणि बारीक दळून घ्यावा. राजगिरा पीठ दोन वाटी घ्यावे. तीनही काकडी साल काढून किसून घ्याव्यात. किसलेल्या काकडी पाण्यासकट घ्यावी. राजगिरा पिठामध्ये किसलेली काकडी, दाण्याचा कूट, हिरवी मिरचीचे वाटण, बारीक चिरलेली कोथिंबीर , जिरे , मीठ टाकून पीठ चांगले मळून घ्यावे. गरज लागली तरच पाणी घालावे.

तर कढईमध्ये साजूक तूप द्यावे. पिठाचे छोटे छोटे गोळे करून थालीपीठ छान गुलाबी खरपूस भाजून घ्यावे. ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व करावे. काहीजण उपवासाला काकडी खात नाहीत. त्यांनी काकडी ऐवजी बटाटा किसून घालावा. नवरात्रामध्ये लाल भोपळा उकडून घातला तरीही छान थालीपीठ होतात.

पोषणमूल्ये: राजगीर यामधील प्रोटीन पचायला खूप हलके असतात. लोह, कॅल्शियम, आणि फॉलिक ऍसिड चा राजगिरा उत्तम स्त्रोत आहे. त्याचप्रमाणे भरपूर काकडी असल्यामुळे फायबर मिळते.

Post a Comment

0 Comments