।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा

 ।। जागर शक्तीचा ।।

जागर कर्तृत्वाचा 

" झेप भयमुक्त जीवनाकडे "


 पिडीत महिलांसाठी आशेचा किरण ठरलेल्या ॲड.निर्मला चौधरी

 २००३ साली  न्यायाधार च्या कामास सुरवात झाली. आमच्या  सदस्या सर्व महिला वकील आणि समाजसेविका आहेत. मधल्या रिकाम्या वेळात महिला यायच्या आणि प्रश्न विचारायच्या त्यांचे व्यक्तिगत अधिकार, कौटुंबिक अन्याय ,अत्याचार असे विविध विषय त्यात असायचे. २००३ पासून २०१९ पर्यंत राज्यभरातील सुमारे ७,३९५ महिलांचे संसार सुरळीत करण्यासाठी संस्थेने प्रयत्न केले. न्यायालयात दाखल झालेल्या अनेक महिलांना कायदेविषयक मदत दिली जाते. "झेप भयमुक्त जीवनाकडे" हे  ब्रीद घेऊन आम्ही महिला करतो असं न्यायाधरच्या अध्यक्षा ॲड.निर्मला चौधरी मोठ्या अभिमानाने सांगतात. त्यांना ॲड. नीलिमा भणगे , नीलिमा बंडेलू , मंदाकिनी चन्ना , शबाना , दीक्षा बनसोडे, आदींची मोलाची साथ मिळते. या व्यतिरिकत एका एस.एम.एस वर पन्नास  जास्त महिला गोळा होतात. 

अकोले तालुक्यात वडिलांनीच नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली ही पहिली केस न्यायाधार ला मिळाली.  मुलीची आई मुलीला घेऊन  आमच्या कडे आली त्यावेळी आम्ही त्या केसच्या अनुषंगाने अभ्यास करू लागलो. पूर्वी अश्या अनेक घटना घडल्याहोत्या त्यांचा अभ्यास केला. त्या मुलीची फिर्याद दिल्यानंतर आम्ही ठाम पणे तिच्या पाठीशी उभ्या राहिलो . या केस मध्ये निकाल आमच्याच बाजूने लागला. मात्र या केसमश्या आमच्या लक्षात आलं कि मुलीच्या आईच्या पाठीशी त्यांचे कुटुंब खंबीर पणे उभे किती महत्वाचे असते . शिवाय कोर्ट केस मध्ये फिर्यादीने टिकणे किती महत्वाचे असते. या यशामुळं आमचा हुरूपही द्विगुणित झाला. महिलांनी सुशिक्षित असणं किती महत्वाचं असतं तेही कळालं . रात्री १. वाजता घटना घडल्या बरोबर मूलीच्या आईने मुलीला घेऊन तडक डी.एस.पी  ऑफिस गाठलं होत. त्यामुळं मुलीची मेडिकल वेळेत झाली आणि  तोच रिपोर्ट या प्रकरणातील महत्वाचा पुरावा ठरला. 

मग अश्या केसेस येत गेल्या. सासरी जाच, सासरच्यांनी जाळलेलं , अशी कितीतरी प्रकरणं आम्ही हाताळली. पण मला एका केसचा आवर्जून उल्लेख  करावासा वाटतो , पुणे जिल्ह्यातली एक अज्ञान मुलगी गरीब असल्याने आणि लहानपणीच आईवडील गेल्याने आजीनं नात्यातील मुलाशीच तीच लग्न लावून दिलं.मुलगी नांदायला मुलाच्या घरी गेली आणि आपली फसगत झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तेथे त्या मुलाच्या पहिल्या पत्नीनं तिला तिथे नांदवण्यास नकार दिला.  

ग्रामीण भागात अजूनही मुलगी वयात आल्याबरोबर टिव्ह लग्न लावून दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपते आणि मुलगीही सुरक्षित होते अशी  समजूत आहे . शिवाय लग्न करून देणार्याला कन्यादानाचे आनंद मिळतो मुलीचा संसार उभा केल्याचं समाधान मिळतं. त्यामुळे प्रथा ,रूढी,  परंपरा पाळल्या जातात असा समज रूढ  आहे. मात्र इथे वेगळंच घडलं फसगत झालेल्या मुलीची तिथेच नगर जिल्ह्यातील मुळाशी ओळख झाली तो तिला नगर जिल्ह्यात घेऊन आला त्याच्याच बरोबर त्याच्या घरात राहून मजुरी कामाला जात होती. पुढे ती अल्पवयीन मुलगी त्याच्यापासून गरोदर राहिली. मात्र मुलाच्या आईने मुलीला घरात घेण्यास नकार दिला. तर इकडे पुण्यातील तिच्या नातेवाईकांनी मुलगी हरवली असल्याची फिर्याद  पिंपरी चिंचवड ठाण्यात दिली. गरोदर मुलगी शेवगावात राहून मोल मजुरी करत होती. तिथेच एका दवाखान्यात तिची प्रसूती झाल्यानंतर ती पाथर्डीला घरी परतली तसं त्या मुलाच्या आईनं तुझा नवरा कामावर गेला आहे. तू तिथे जा इथे  नको असे म्हणत तिच्या कडील बाळाला हिसकावून घेतलं. ती तिथून गेल्यानंतर बाळाला मारून टाकलं. तिच्या नवऱ्याने व दिरानं तिला नेवाश्यात नेऊन पारध्यांना विकलं. पारध्यांच्या प्रथेनुसार तिला डोंगरावर एका मंदिरात नेऊन तिच्याशी लग्न केलं मात्र या लग्नामुळं पारधी समाजात भांडणं सुरु झाली. जाती बाहेर लग्न केल्याचा ठपका नवऱ्यामुलावर ठेऊन हाणामाऱ्या झाल्या. ओघानंच प्रकरण पोलीस स्टेशन ला गेलं आणि तिथे पारध्यांनी या मुलीलाच गन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यामुलीला नगरच्या कोर्टात न्यायमूर्ती गिमेकर यांच्या उभे करण्यात आलं. तिथे मात्र त्या मुलीने सर्व  सांगितली न्यायाधीश गिमेकरांच्याही  लक्षात आलं कि हि मुलगी गुन्हेगार नसून तिच्यावरच अन्याय  झाला आहे. मग त्या मुलीला न्यायाधारमध्ये पाठवण्यात आले. त्यावेळी ती साडे सतरा वर्षांची होती. मुलीच्या वतीने या खटल्यात तिचा नवरा, दीर, आणि पारधी समाजातील ज्या मुलाने लग्न केलं या तिघांना १० वर्ष प्रत्येकी शिक्षा झाली. अन्य दोन व्यक्तींनाही ३ वर्ष प्रत्येकी शिक्षा झाली. पण ती मुलगी जेव्हा कोर्टात यायची तिला न्यायालयाच्या आवारात मिळणारी हीन वागणूक, तिरस्कार , त्याची  मनात असायची. ह्या मुली अश्याच असतात सतरा वर्षाच्या वयात हिची ३ लग्न झाली असा टोमणा लोकं मारायचे तयेव्ह खूप वाईट वाटायचे. मात्र एक दिवस पुणे जिल्ह्यातल्याच एका युवकाचा मला   फोन आला त्याने स्वतःची  सांगितली आणि मी त्या मुलीशी लग्न करू शकतो का असं विचारलं. का नाही ,पण ..... मी म्हणाले त्यावर त्याने विचारलं पुढे काही झालं तर ? मी आहे कि मी म्हणाले . तू कशा काळजी करतोस मी आहे कि पुढे त्या दोघांनी लग्न केलं त्या मुलाचं पुणे जिल्ह्यातच मिठाईचे दुकान आहे. म्हणजे बघा ज्या मुलीचे खाण्यापिण्याचे  होते, तिच्या समोर आज पक्वान्न हजर असतात. आज त्या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. ह्या चौकोनी कुटुंबात ती सुखी आहे. अधून मधून माझ्याशी संपर्क होतो. त्या आनंदी कुटुंब कडे पाहून माझंही मन आनंदी होत. 

मध्यंतरी कलम-४९८ वरून बराच वादंग निर्माण करण्यात आला. मुली खोट्या तक्रारी करतात सासरच्यांना गुन्हेगार ठरवतात असा आक्षेप घेण्यात आला.मात्र आम्ही त्याचा सनदशीर मार्गानं विरोध केला. शेवटी सुप्रीम कोर्टाला आमचं म्हणणं मान्य करावं लागलं. कलम-४९८ ला  मान्यता देऊन गुन्हा दाखल झाल्या बरोबर अटक करण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली. 

आता विवाहित महिलांना देखील वडलांच्या संपातीतील वाटा मिळणार असल्याने स्त्री अधिक सुरक्षित झाली आहे. या कायद्याचं स्वागतच करायला हवं असं निर्मला चौधरी म्हणाल्या. 

न्यायाधारच्या माध्यमातून महिलांना त्यांचे हक्क,अधिकार ,आणि पीडित महिलांना कायदेशीर मार्गदर्शन करून अनेक महिलांचे संसार उभे करणाऱ्या ॲड.निर्मला चौधरी यांना " नगर टुडे  "  परिवाराचा सलाम .  


Post a Comment

0 Comments