आरोग्य आहार

आरोग्य आहार 


नवरात्र विशेष उपवासासाठी आहार

उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना नऊ दिवसाचे उपवास आहेत. उपवासाच्या वेळी आपला आहार कसा असला पाहिजे. उपवास म्हणजे शरीराचे शोषण नव्हे. शरीराला त्रास देऊन, म्हणजे अतिकडक उपवास, अन्नपाणी वर्ज्य करणे असे अपेक्षित नाही. उपवासाचा मधील आहार हा बुद्धी, शक्ती वाढवणारा, सुखावह असला पाहिजे. उपवासामुळे अशक्तपणा वाढला नाही पाहिजे. तर मग आपला आहार कसा असला पाहिजे? आपल्या शरीराचे डिटॉक्स फिकेशन करणे, पचनशक्ती चांगली करणे, हे आपण या नऊ दिवसांमध्ये करू शकतो. योग्य पद्धतीने आहार घेतला तर याचा उपयोग नक्की वजन कमी करणे, चरबी कमी करणे, याकरिता नक्की होऊ शकतो. कुठलाही अशक्तपणा न येता. प्रत्येकाच्या घरच्या प्रथा, परंपरा यानुसार काही लोकांना काही पदार्थ चालतात , तर काही लोकांना काही पदार्थ चालत नाहीत.

उपवास करताना आहार थोडासा घ्या, पण पोषण मूल्यांनी भरपूर घ्या.

ताजी फळे, सुकामेवा, मनुका, बेदाणे, खारीक, खजूर, जरदाळू यांचा आहारात समावेश करावा. त्याच प्रमाणे आंबा पोळी, फणस पोळी, मोरावळा, कोहळ्याचा पेठा हे फळांपासून बनलेले पदार्थ घेऊ शकता. त्याचं प्रमाणे आवळा, लिंबू, कोकम सरबत घेऊ शकता. आहारामध्ये शहाळे, दही, ताक याचे प्रमाण वाढवा. भगरीची भाकरी, त्याचप्रमाणे राजगिरा भाकरी घेऊ शकता. राजगिरी मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह आहे. रताळे विटामिन B6 चा उत्तम स्त्रोत आहे.शिंगाडा सुद्धा पोषण मूल्यांनि भरपूर आहे. अळीव लोहाचा उत्तम स्त्रोत आहे. तर असे हे सर्व पोषण मूल्यांनी भरपूर असलेले पदार्थ वापरून आपण वेगवेगळ्या पाककृती पुढील नऊ दिवस पाहणार आहोत. जेणेकरून आपले नऊ दिवसांचे उपवास नक्कीच आरोग्यदायी व आनंददायी होतील.

गव्हाच्या कोंड्याचे गोड मुटके 

साहित्य : 

१ वाटी गव्हाचा कोंडा , पाव वाटी जाडसर कणिक , ओले खोबरे , पाव वाटी , २ चमचे बडीशेप पावडर , वेलची , काजू , बदामाचे काप , बासुंदी १/२ वाटी, पाऊण वाटी  गूळ. 

कृती: 

प्रथम  गव्हाचा कोंडा , जाड कणिक , गूळ , ओले नारळ , बडीशेप पावडर, चवीपुरते किंचित  मीठ ,एकत्रित करून पीठ मळून घ्यावे . त्यानंतर त्याचे हाताने मुटके करून मोदकपात्रात चांगले वाफवून घ्यावेत. गार झाल्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. एका बाउल मध्ये हे तुकडे घेऊन त्यावर बासुंदीने गार्निशिंग करावे.काजू व बदामाचे काप घालून डेकोरेट करावे. 

तयार डिश पंधरा मिनिटे फ्रिज मध्ये ठेऊन गारच सर्व्ह करावी.बासुंदी मुळे कुल्फीसारखी फील येते. 

पोषक मूल्ये:

गव्हातील कोंड्यामुळे भरपूर फायबर मिळते.तर सेंद्रिय गुळामुळे आयर्न मिळते.बासुंदी , काजू, बदाम काप या सर्वामुळे पदार्थ अधिकच पौष्टिक होतो . 

अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak 


Post a Comment

0 Comments