स्व.अनिल राठोड त्यांच्या कार्यातून आपल्या स्मरणात राहतील

 स्व.अनिल राठोड त्यांच्या कार्यातून आपल्या स्मरणात राहतील


 माजी मंत्री अर्जुन खोतकर

 वेब टीम नगर : सर्वसामान्यांचा नेता, जनतेसाठी दिवस-रात्रं झटणारा कार्यकर्ता, शिवसेनाचा सच्चा सैनिक अशी ख्याती असलेले स्व.अनिल राठोड यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. म्हणूनच  25 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्‍न सोडविले. सामान्यांचे प्रश्‍न सुटावे, त्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. शिवसेना पक्ष नगर जिल्ह्यात वाढवून विविध स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकविला. त्यांची जनसेवेची ही कारकर्दी नगरकरांच्या व शिवसैनिकांच्या स्मरणात  राहील. तुमचा आमचा सर्वांचा भैय्या त्यांच्या कार्यातून आपल्यात कायम राहील, असे प्रतिपादन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.

     माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व माजी आमदार सुरेश नवले यांनी स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या परिवाराची भेट घेऊन सात्वंन केले. याप्रसंगी विक्रम राठोड, अमोल ठाकूर, मदन आढाव आदि उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शिवालय येथे जाऊन स्व.अनिल राठोड यांच्या प्रतिमस अभिवादन केले व नगरसेवक पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे, गणेश कवडे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, दिपक खैरे, संजय शेंडगे, राम नळकांडे, निलेश भाकरे, अनिल बोरुडे, दत्ता कावरे, बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, मुन्ना भिंगारदिवे, अभिषेक भिंगारदिवे, डॉ.श्रीकांत चेमटे, कावळे, अशोक तुपे, अरुणा गोयल आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

     याप्रसंगी आ.सुरेश नवले यांनीही स्व.अनिल राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Post a Comment

0 Comments