आरोग्य आहार

 आरोग्य आहार 



पालक पनीर राईस 

साहित्य :

१ वाटी बासमती तांदूळ , १ जुडी निवडलेला पालक ,आले-लसूण हिरवी मिर्चीची पेस्ट , मध्यम आकाराचा कांदा , पनीरचे तुकडे , तेल , लवंग , मिरी , दालचिनी , तमालपत्र , गरम मसाला  , काजू. 

तयारी:

प्रथम तांदूळ धुवून चाळणीत ठेवणे,आलेलसूण हिरवी मिर्चीची पेस्ट करून ठेवणे. कांदा भाजी साठी चिरतो तास लांबट कापून घेणे. पालक धुवून त्याची प्युरी करून ठेवणे. पनीरचे छोटे तुकडे करून ठेवणे. 

कृती :

प्रथम गायीच्या तुपामध्ये मिरे,लवंग , दालचिनी , तमालपत्र , घालून फोडणी करणे. त्यामध्ये लांब चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतणे.त्यानंतर आलेलसूण मिर्चीची पेस्ट घालून परतणे. 

धुतलेला तांदूळ , पनीर घालून एक वाफ आणणे. त्यानंतर तयार प्युरी घालून प्युरी पूर्णपणे आटे पर्यंत तांदूळ परतणे. 

तांदळाच्या दुप्पट पाणी घालून मीठ,गरम मसाला,चवीपुरती साखर घालून भट मोकळा शिजवूनघेणे . काजू व बदाम यांचे काप घालून सर्व्ह करणे. कांदा , टोमॅटो, व काकडी बारीक चिरून त्यात डाळिंबाचे दाणे मिक्स करणे त्यात मीठ,साखर ,मिरेपूड , दही घालून रायते करून ते सर्व्ह करावे. 


पोषक मूल्ये : 

पालकांमध्ये व्हिटॅमिन "C" व "K" भरपूर प्रमाणात असते.पालकांमधून फायबर व कॅरोटिनॉइड्स मिळतात. पनीर मुळे भरपूर प्रोटीन मिळते. लवंग , मिरी दालचिनी हे अँटिव्हायरल चे काम करतात. 


अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak 

Post a Comment

0 Comments