महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरु _

 महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरु 


-पंतप्रधान . नरेंद्र मोदी   गावातील प्रत्येकाला शुद्ध पाणी  देण्याचा  प्रयत्न 

वेब टीम नगर -  १३ जिल्ह्यात भूजल पातळीचा स्तर  अत्यंत कमी होता अश्या जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरु करण्यात आली असून या योजनेतून या १३ जिल्ह्यातील , गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी देण्याचे काम सुरु असल्याचे सांगून यात नगर जिल्ह्याचाही समावेश असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. 

 माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन  पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. या व्हर्चुअल कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात अटल भूजल योजना सुरु असून गावातील प्रत्येक परिवाराला शुद्ध पाणी मिळणार आहे. राज्यात १९ लाख परिवारांना शुद्ध पाण्याची सुविधा मिळाली त्यामध्ये १३ लाख परिवारांना कोरोनाच्या काळातही पाणी पोहोचवले असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

महाराष्ट्रात १०० अधिक इथेनॉलचे प्रकल्प सुरु आहेत. तेलाचा  बाहेर  जाणारा पैसा आता शेतकऱ्यांना मिळेल त्यासाठीच साखर कारखान्यांना प्रोत्साहन दिले.पाण्याच्या प्रश्नावर स्व. विखे यांनी  जनआंदोलन केले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची ओळखच पाण्याच्या कामासाठी आहे.२६ योजनांद्वारे त्यांनी घराघरात पाणी पोहोचवले यातील ९ योजना पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत ५ लाख हेकटर जमिनींना सिंचनाखाली आणण्यात सरकारला यश आलं. २०१८ च्या जुलै मध्ये ९० सिंचन प्रकल्पांचे काम सुरु झाले होते. २-३ वर्षात हे काम पूर्ण होईल. 

Post a Comment

0 Comments