कांशीराम यांनी बहुजन समाजाला जोडण्याचे काम केले

 कांशीराम यांनी बहुजन समाजाला जोडण्याचे काम केले 

सुनिल ओव्हळ : बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे संस्थापक नेते स्व.कांशीराम यांना अभिवादन

वेब टीम नगर:उत्तरप्रदेशमध्ये कांशीराम यांनी बहुजन समाजाला जोडण्याचे काम केले. बहुजन समाज संघटित करुन त्यांनी सत्ता मिळवून, बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम केले. मात्र सध्या उत्तरप्रदेशमध्ये जातीयवादी सरकार सत्तेत असून, तेथील बहुजन समाजावर अन्याय, अत्याचार सुरु आहे. उत्तरप्रदेशच्या हाथरस व बलरामपूर मधील बलात्कार घटना देशापुढे आली आहे. आज उत्तरप्रदेशला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करणारे स्व.कांशीराम यांच्या सारख्या नेतृत्वाची खर्या अर्थाने गरज असल्याची भावना सुनिल ओव्हळ यांनी व्यक्त केली.

बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे संस्थापक नेते स्व.कांशीराम यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी ओव्हळ बोलत होते. सिध्दार्थनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय डहाणे, राजू शिंदे, उमाशंकर यादव, गणेश बागल, संतोष जाधव,  जितेंद्र साठे, संदिप चव्हाण, अतुल काते, स्वप्निल पवार, मोहन काळे, प्रतिक जाधव, अनिल कांबळे, प्रमोद साळवे, संतोष जाधव, सलिम अत्तार, राहुल पंडागळे आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात राजू शिंदे यांनी उत्तरप्रदेशमध्ये कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पार्टीने मिळवलेली सत्ता व त्यांचे कार्याची माहिती दिली. संजय डहाणे म्हणाले की, कांशीराम यांनी महाराष्ट्रात राहून फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले. या विचारांनी त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाजाला एका छताखाली आनले. 1995 साली उत्तरप्रदेश राज्यातील निवडणुका जिंकून मायावतींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली. त्यांनी एक नेता, एक मिशन व एक निशाण हा संदेश घेऊन काढलेली जम्मू ते काश्मीर सायकल रॅलीने सर्व बहुजन समाजाला ऊर्जा मिळाली. त्यांचे कार्य व विचार आजही दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. बौध्दाचार्य दिपक पाटोळे यांनी प्रस्थापितां विरोधात कांशीराम यांनी एक पर्याय निर्माण केला होता. देशभरात बहुजन समाज पार्टीचा प्रचार प्रसार करुन बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले.


Post a Comment

0 Comments