मेणबत्त्या प्रज्वलीत करुन पिडीत तरुणीला श्रध्दांजली

मेणबत्त्या प्रज्वलीत करुन पिडीत

तरुणीला श्रध्दांजली


भाजप सरकारच्या जातीयवादी वृत्तीमुळे दलित समाजावर अत्याचार 

पवन भिंगारदिवे : भिंगारला आरपीआयच्या वतीने हाथरस घटनेचा निषेध 

आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

वेब टीम नगर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा भिंगारच्या भिमनगरमध्ये निषेध नोंदविण्यात आला. तर बुध्दविहार येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करुन पिडीत तरुणीला श्रध्दांजली वाहून, हाथरस येथील घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तर हिटलशाही भाजप हटाव लोकशाही बचावच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

 यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम शेख, अक्षय गायकवाड, रोहित भिंगारदिवे, हर्षद वाघमरे, अमित घोरपडे, संकेत घोडके, आशितोष भिंगारदिवे,  ऋषिकेश गायकवाड, अभिषेक शेलार, पप्पू शेलार, अनिकेत घोडके, गणेश पंडित, प्रवीण भिंगारदिवे, शहबाज शेख, फरीद सय्यद, संतोष सारसर, गौरव भिंगारे, भिम वाघचौरे, विकी प्रभळकर, आकाश काळे, कार्तिक म्हस्के, उमेश गायकवाड, वैभव भालेराव आदिंसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

पवन भिंगारदिवे म्हणाले की, भाजप सरकारच्या जातीयवादी वृत्तीमुळे दलित व अल्पसंख्यांक समाजावर अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. युवकांच्या बेरोजगारीचा व शेतकर्यांचा प्रश्न निर्माण झाला असून, केंद्र सरकार चुकीचे धोरण राबवून सर्वांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र रचत आहे. तर भाजप सरकार संविधानाच्या विरोधात हुकुमशाही पध्दतीने कारभार करीत असून, जातीयवादामुळे सर्वसामान्य भारतीय जनता होरपळत आहे. हाथरसच्या घटनेने योगी सरकारचा खरा चेहरा देशापुढे आला असल्याचे त्यांनी सांगितले. सुशांत म्हस्के यांनी हाथरस येथे दलित तरुणीवर अत्याचार होऊन देखील त्याची दखल घेतली जात नाही. उलट उत्तरप्रदेश पोलीस मुलीचा मृतदेह रात्रीतून जाळून टाकण्यात आला. पिडीत मुलीच्या कुटुंबीयांवर दडपण आणले जात आहे. या घटनेच्या काही दिवसातच बलरामपूर येथे दलित तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला. उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्था नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचे सांगितले. 


Post a Comment

0 Comments