संजय दत्तची अवस्था पाहवेना संजय दत्तची अवस्था पाहवेना

 चाहत्यांची वाढली काळजी

वेब टीम मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत त्याची तब्येत फार खंगलेली  दिसत आहे. एअरपोर्टवरच्या या फोटोने अनेक हितचिंतकांना  चिंतेत पाडलं आहे.  . हा फोटो व्हायरल झाल्यानंतर संजय दत्तच्या चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जेव्हा संजयचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा सुरुवातीला अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. केमोथेरपीनंतर संजयची तब्येत प्रचंड खालावलेली दिसली. हा फोटो पाहून एकाने लिहिले की, 'बाबा खूप कमकुवत दिसत आहे. तू यातून लवकरात लवकर बरा होशील अशी प्रार्थना करतो.' तर दुसर्‍याने लिहिले की, 'मला आशा आहे की तो लवकर यातून बरा होईल.'

दरम्यान, संजय दत्त या आजारातून पूर्णपणे बरा झाला नसून अजूनही तो फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार घेत आहे. आतापर्यंत त्याच्यावर दोन केमोथेरपी झाल्या आहेत. अजून किती केमोथेरपी त्याला घ्याव्या लागतील याबद्दल संभ्रम आहे. ११ ऑगस्ट रोजी त्याने सोशल मीडियावर माध्यमातून तो उपचारांसाठी कामामधून ब्रेक घेतल्याचं सांगितलं. पण अजूनही संजयने किंवा त्याच्या कुटुंबियांकडून संजयला नेमकी कोणता आजार झालाय याबद्दल कोणतंही अधिकृत विधान दिलेलं नाही.

Post a Comment

0 Comments