राऊत यांचे कंगनावर शरसंधान

 

राऊत यांचे कंगनावर शरसंधान 

वेब टीम मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना  राणावत वर पुन्हा एकदा शरसंधान केले आहे.  कंगना राणावतच्या  बंगल्याच्या पाडकामाच्या  वेळी ज्या पक्षाने त्यांची साथ दिली त्यांनी आता हाथरस मधील बलात्कार पीडिते  बाबतही आवाज उठवावा असे आवाहन केले आहे.  उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये घडलेल्या  घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या अतिरेकी पणाचा  त्यांनी कडक   समाचार घेतला,राऊत म्हणाले ज्या लोकांनी अभिनेत्रीच्या अनधिकृत बांधकामाबद्दल आमच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांनी आता मात्र  या बाबतीतही अशीच मागणी करावी संजय राऊत आणि कंगना राणावत  यांच्या मध्ये सुरू असलेल्या शीतयुद्ध वरून कंगना रानावतने  मुंबईची तुलना पी ओ के शी  केली होती , त्यानंतर राऊत यांनी रानावतचा  हरामखोर (नॉटी )असा उल्लेखकेला होता.  9 सप्टेंबर रोजी कंगना  रानावतच्या  पाली हिल येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम बीएमसी ने फोडले याबाबतीत मुंबई हायकोर्टाचा दरवाजाही ठोठावण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments