सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच

 


सुशांत सिंह राजपूतची  आत्महत्याच

वेब टीम मुंबई : सुशांत सिंह राजपूत चा मृत्यूनंतर ११०  दिवसांनी आज मोठा खुलासा एम्सच्या पॅनल केला आहे.  त्यांनी आपल्या अहवालात सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.  एम्सचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता म्हणाले की आत्महत्येचाच  प्रकार आहे .सुशांत सिंह  राजपूत ची हत्या झालेली नाही सीबीआय'ने सांगितले आहे की याबाबतीत स्पष्ट खुलासा होणे बाकी आहे.  सुशांत सिंह राजपूत ऑटोप्सीचा  अहवाल तयार करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी डॉक्टर सुधिर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एम्सच्या पाच डॉक्टरांची समिती बनवली गेली होती २८सप्टेंबरला त्यांनी आपला रिपोर्ट सीबीआयला दिला.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशांतच्या शरीरामध्ये ते कोणतेही विष आढळून आले नाही, तसेच सुशांतचे  शवविच्छेदन करणाऱ्या मुंबईतल्या कूपर हॉस्पिटलच्या  डॉक्टरांना मात्र क्लीनचिट देण्यात आलेली  नाही. सुशांतच्या गळ्यावर असलेल्या खुणा यांच्या बाबतीत कोणताही खुलासा कूपर हॉस्पिटलच्या शवविच्छेदनाच्या अहवालात नव्हता त्यामुळे त्यानंतर सीबीआय ने एम्स कडून शवविच्छेदन करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

Post a Comment

0 Comments