माथाडी कामगारांच्या खात्यात चार हजार रुपयांची मदत जमा

माथाडी कामगारांच्या खात्यात 

चार हजार रुपयांची मदत जमा

माथाडी मंडळ कामगारांच्या पाठिशी उभे असल्याची भावना निर्माण होईल: अविनाश घुले

 वेब टीम   नगर: कोरोनाच्या काळात अनेक दिवस बंद असल्याने माथाडी कामगारांवर आर्थिक संकट ओढवले, यातून मार्ग काढण्यासाठी माथाडी कामगारांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यासाठी राष्ट्रवादीचे खा.शरद पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ, महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव यांच्याकडे जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने पाठपुरावा करुन आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार आज माथाडी कामारांच्या खात्यात रुपये चार हजार जमा करण्यात येत आहेत. या  मदतीने कामगारांना बळ मिळणार आहे. राज्य सरकार आणि माथाडी मंडळ हे माथाडी कामगारांच्या पाठिशी उभे आहे, ही भावना निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.

  माथाडी कामगारांच्या खात्यात चार हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली. त्याचा धनादेश सहाय्यक कामगर आयुक्त चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, निरिक्षक पी.व्ही.लोंढे, केरबा पोळ, विलास उबाळे, वसंत पेटारे आदि उपस्थित होते.

  पुढे बोलतांना अविनाश घुले म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे प्रभावित झालेल्या माथाडी कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी जी माथाडी मंडळे सक्षम आहेत किंवा आर्थिक परिस्थितनुसार मंडळाच्या प्रशासकीय राखीव निधीमधून ही मदत देण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील सुमारे २७०० माथाडी कामगारांना चार हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. सुमारे एक कोटीपेक्षा जास्त रक्कम जिल्ह्यातील माथाडी कामगारांना वितरीत करण्यात येणार असल्याचे अविनाश घुले यांनी सांगितले.

याप्रसंगी चंद्रक़ांत राऊत म्हणाले, शासनाच्यावतीने माथाडी कामगारांसाठीच्या ज्या योजना आहेत, त्याचा जिल्ह्यातील कामगारांना कसा लाभ होईल, यासाठी कामगार कार्यालय प्रयत्नशील असते. आज माथाडी मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कामगारांच्या खात्यात रुपये चार वर्ग करण्यात येत आहेत. जे कामगार माथाडी मंडळात  नोंदीत आहेत आणि जे नियमित आपला पगार मंडळात भरतात, अशा कामागारांना त्याचा लाभ होणार आहे. पुढील काळातही अशा योजनांचा लाभ संबंधितांना मिळेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी गोविंद सांगळे यांनी कामगारांच्या हक्कासाठी जिल्हा हमाल पंचायत नेहमीच प्रयत्नशील असते. कामगारांच्या अडचणी सोडवून त्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न नेहमीच केला जात आहे. असे सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर केकाण यांनी केले तर आभार पी.व्ही.लोंढे यांनी मानले. यावेळी खात्यात पैसे जमा झाल्याने कामगारांना जिल्हा हमाल पंचायत व माथाडी महामंडळास धन्यवाद दिले.

Post a Comment

0 Comments