रेल्वे आकारणार प्रवाशांकडून युजर चार्ज



रेल्वे आकारणार  प्रवाशांकडून युजर चार्ज 

वेब टीम नवी दिल्ली: रेल्वेनेप्रवाशांकडून युजर चार्ज आकारण्याची घोषणा नुकतीच केली. आता प्रवाशांकडून युजर चार्जनुसार १० ते ३० रुपये अधिक आकारण्याची रेल्वेने तयारी केली आहे. युजर चार्जच्या आकारून प्रवासी भाडे वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावर मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागेल, असं सूत्रांनी सांगितलं. देशात सध्या ७००० रेल्वे स्थानकं आहेत. यापैकी १० ते १५ टक्के म्हणजे किमान १०५० रेल्वे स्थानकांवर युजर चार्ज आकारला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.करोना संकटाने आधिक नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत आता प्रवाशांकडून युजर चार्ज आकारण्याची तयारी रेल्वेने केली आहे. यामुळे प्रवासी भाडे वाढणार आहे.

प्रवाशांना १० ते ३० रुपये युजर चार्ज आकारण्याची रेल्वेची तयारी, वातानूकुलित वर्गासाठी कुणाला किती द्यावा लागेल चार्ज?

एसी  फर्स्टच्या तिकिटावर ३० रुपये, एसी  सेकंडच्या तिकिटावर २५ रुपये, एसी  थर्डच्या तिकिटावर २० रुपये आणि स्लीपरवर १० रुपये युजर चार्ज लागू करण्याता प्रस्ताव आहे. दोन्ही स्थानकांवर युजर चार्ज आकारण्यात येणार असल्याने दिल्ली ते मुंबई प्रवास आणखी महाग होईल. दिल्ली-मुंबईसह सुमारे ५० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांकडून युजर चार्ज आकारला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि मुंबईसह नागपूर, अमृतसर, ग्वाल्हेर आणि साबरमती या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. जीएमआर, अदानी यांच्यासह अनेक खासगी कंपन्यांनी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासात रुची दाखवली आहे.

युजर चार्जचा बोजा सामान्य प्रवाशांवर टाकणार नाही, असं काही दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले होते. यजुर चार्जमधून आलेल्या निधीतून रेल्वे स्थानकांच्या मौल्यवान जमिनीवर प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी मॉल, कॅफे आणि हॉटेल्स बांधली जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments