वसंत टेकडी जवळील पाईपलाईन फुटली

संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी...

नगरसेवक त्र्यंबके यांनी तातडीने लक्ष घातल्याने गळती बंद


    वेब टीम  नगर : वसंत टेकडी येथील मुख्य पाईपलाईनला शनिवारी मध्यरात्री गळती लागल्याने रविवारी पहाटेपर्यंत जवळच असलेल्या संदेशनगर वसाहतीत अक्षरश: घरा-दरांत पाणीच पाणी साचले अनेकांना मध्यरात्री पाऊस झाला असावा व हे पाणी आले असे वाटले.

     रविवारी सकाळी टाकीजवळच राहणार्‍या नागरिकांनी पाणी कोठून येते हे शोधत असतांनाच मुख्य पाईपलाईन फुटल्याचे दिसले. तातडीने या वसाहतीत राहणारे नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी तातडीने लक्ष घातले. वसंत टेकडी येथे जाऊन श्री.त्र्यंबके यांनी मुख्य पाईपलाईनची पाहणी करुन मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे निदर्शनास आले. आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना माहिती दिली. त्यांनी संबंधितांना सूचना करुन पाणी उपसा बंद करण्यास सांगितल्यानंतर गळती थांबली.

     शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास पाईपलाईन फुटली रविवारी सकाळी पाणी बंद  होईपर्यंत संदेशनगरमधील नागरिकांच्या घरात-दारात पाण्याचे तळे साचले. नगरसेवक त्र्यंबके यांनी घरातून पाणी काढण्यासाठी स्वत: नागरिकांना मदत केली. तातडीने लक्ष घातल्याने पाणी बंद करता आले. दुपारपर्यंत दुरुस्ती होऊन पूर्ववत पाणी उपसा सुरु झाल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments