पुण्यात जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तन पुण्यात जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरसोबत  अश्लील वर्तन

वेब टीम पुणे: राज्यात कोविड केअर सेंटरमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, पुण्यातील शिवाजी नगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.त्यामुळे कोविड केअर सेंटरमधील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

राज्यात करोनाचा कहर सुरू आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारले आहेत. या ठिकाणी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. अशाच काही सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिला आणि तरुणींचे विनयभंग किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. कोविड सेंटरमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. राज्यातील अनेक नेत्यांनी हा मुद्दाही उपस्थित केला होता. त्यात आता पुण्यातही डॉक्टर महिलेच्या विनयभंगाची घटना उघडकीस आली आहे.

पुण्यातील शिवाजी नगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे तेथे काम करणाऱ्या सहकारी डॉक्टारांनी हे कृत्य केले आहे. या प्रकरणी २५ वर्षीय महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments