ड्रग्ज प्रकरणी दीपिकाची आज चौकशी
मोठे मासेही अडकणार एनसीबीच्या जाळ्यात,शाहरुखही रडारवर
वेब टीम मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. आज, 26 सप्टेंबर रोजी दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करणार आहे. ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत. एनसीबीने समन्स बजावल्यामुळे सारा अली खान आज त्यांच्यासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. आज सकाळी दहा वाजता ती आपल्या जुहू येथील बंगल्यातून कार्यालयाकडे रवाना होणार आहे.
तिच्या जुहू येथील बंगल्यासमोर आज पहाटेपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. जुहू येथील बंगल्यातून रवाना झाल्यानंतर ती काही वेळातच एनसीबी च्या कार्यालयात पोहोचेल क्वान कंपनीची टॅलेंट मॅनेजर जया शाह हिची आणि ड्रग्ज विक्रेता अनुज केशवानी यांच्या चौकशीत श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत यांची नावं समोर आली होती. याबाबत मंगळवारी एनसीबीने जया शाहची चौकशी केली होती. त्यामध्ये जयाने माहिती दिली होती की तिने श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती यांच्यासाठी सीबीडी ऑईलची ऑनलाईन ऑर्डर केली होती. यामध्ये तिने हे देखील नमूद केलं आहे की यासाठी तिने कोणत्या पेडलरशी संपर्क साधला नव्हता. त्यानंतर जयाला पुन्हा गुरुवारी चौकशीसाठी बोलवण्यात येणार होतं, परंतु मुंबईतील मुसळधार पावसामुळे ते शक्य झालं नव्हतं. जया शहाच्या माहितीच्या आधारे बुधवारी श्रद्धा कपूरला समन्स पाठवण्यात आला होता. त्यानुसार आज श्रद्धा सकाळी 11 पर्यंत एनसीबीच्या ऑफिसला जाण्याची शक्यता आहे.
शाहरुख खानच्या रेड चिली कंपनीच्या एका दिग्दर्शकालाही अटक करण्यात आल्याने आता शाहरुख ही एन.सी.बी च्या रडारवर असून त्यालाही लवकरच चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
0 Comments