दीपिका-करिश्माला समोरासमोर बसवून चौकशी

  दीपिका-करिश्माला समोरासमोर बसवून चौकशी 

 श्रद्धा कपूर वरही प्रश्नांचा भडीमार,सारा अली खानचीही चौकशी 
वेब टीम मुंबई :  ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी सुरु आहे. एनसीबीकडून समन्स आल्यानंतर  आज दीपिका पादुकोण निर्धारित वेळेआधी दहा मिनिटं एनसीबी कार्यालयात पोहोचली. गेल्या दोन तासांपासून तिची चौकशी सुरु आहे. तर जवळपास 12 वाजेच्या सुमारास श्रद्धा कपूर देखील एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. तिची देखील चौकशी सध्या सुरु आहे. एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहेत.


 आज दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करत आहे. ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.
Post a Comment

0 Comments