बाजरी बियाण्याच्या खरेदीत फसवणूक

बाजरी बियाण्याच्या खरेदीत फसवणूक


राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गणेश कळमकर यांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी कृषी विभागाच्या संचालकांना दिले निवेदन 

वेब टीम नगर दि.२३ -  शेतकर्‍यांनी नामांकित कंपनीचे बाजरी बियाणे खरेदी केली. मात्र, हे बियाणे निकृष्ठ दर्जाचे असल्याने बाजरीची उगवण झाली नाही. त्यामुळे बियाणे खरेदी, खत, मशागतीचा हजारो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. बियाण्यांमध्ये फसवणूक करणार्‍या कंपन्यांवर कठोर करवाई करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अन्यथा, नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर शेतकर्‍यांसह बेमुदत उपोषणाचा इशारा नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी सदस्य  गणेश कळमकर. यानी कृषी विभागाचे संचालक शिवाजीराव जगताप यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
नगर तालुक्यातील खातगाव टाकळी, निमगाव घाणा, वडगाव तांदळी आदी गावांमधील शेतकर्‍यांनी बाजरी बियाण्यांमध्ये फसवणूक झाल्याचे सांगितले आहे.
खातगाव टाकळी येथील शेतकरी दत्तात्रय चंद्रभान सातपुते, दादा विठ्ठल देशमुख, गोरक्षनाथ तुकाराम बांदल, बाळासाहेब गंगाधर कुलट, पांडुरंग सातपुते, रमेश दत्तात्रय बांदल या शेतकर्‍यांची पायोनिअर कंपनीच्या बाजरी बियाण्यामुळे फसवणूक झाली आहे.वडगाव तांदळी येथील शेतकरी लहू सतीश ठोंबरे, दीपक सुभाष ठोंबरे, कल्पना शिवाजी खुडे, आकाश जालिंदर ठोंबरे, दिलीप दगडू क्षीरसागर, गोरख रघुनाथ ठोंबरे, महेंद्र मोहन ठोंबरे, वैभव बापूराव ठोंबरे या शेतकर्‍यांची बाजरी बियाण्यांमध्ये फसवणूक झाली आहे.
तरी याभागातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे तातडीने  पंचनामे करून पुढील कारवाई करून शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यासठी मागणी कृषि विभागाचे संचालक शिवाजीराव जगताप यांच्यकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा शेतकऱयांसह बेमुदत उपोषण  करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर वरील सर्व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .


Post a Comment

0 Comments